Home » Blog » SCO : भारत-चीनदरम्यानचा तणाव कायमस्वरूपी संपवावा

SCO : भारत-चीनदरम्यानचा तणाव कायमस्वरूपी संपवावा

by प्रतिनिधी
0 comments
SCO

नवी दिल्ली : शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी चीनचे संरक्षणमंत्री अ‍ॅडमिरल डोंग जून यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. ‘कायमस्वरूपी उत्तम संबंध प्रस्थापित करण्याबरोबरच तणाव संपवण्याच्या दिशेने पावले टाकण्याची अपेक्षा यावेळी करण्यात आली. तसेच भारत आणि चीनमधील जटील सीमा वाद सोडवण्याची आवश्यकता या बैठकीत अधोरेखित करण्यात आली. (SCO)

दोन्ही देशांमधील सीमा समस्या सोडवण्यासाठी कायमस्वरूपी तणाव कमी करण्याचा महत्त्वाचा उल्लेख या चर्चेदरम्यान करण्यात आला. या आधी दोन्ही देशांदरम्यान मान्यवरांची उच्चस्तरीय बैठक झाली होती. त्यानंतर प्रामुख्याने दोन्ही बाजूंमधील संबंध आणि सीमांवर शांतता आणि स्थैर्य राखण्याचा तसेच परस्पर विश्वास, समजूतदारपणा आणि आत्मविश्वास निर्माण करण्यावर भर देण्यात आला होता.

या चर्चेदरम्यान जवळपास सहा वर्षांच्या अंतरानंतर कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. दोन्ही बाजूंनी ही सकारात्मक गती कायम ठेवणे आणि द्विपक्षीय संबंधांमध्ये नवीन गुंतागुंत होणार याची दक्षता घेण्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली’ असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंंग यांनी आपल्या ‘एक्स’ अकाउंटवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. (SCO)

सीमेपलीकडून होणाऱ्या कोणत्याही दहशतवादी कारवायांपासून स्वतःचे रक्षण करण्याच्या भारताच्या दृढनिश्चय पुन्हा एकदा मजबूत करणारे ऑपरेशन सिंदूर मोहिमेचा त्यांनी उल्लेख केला. शेजारी देशांनी आमच्या या अढळ वचनबद्धतेची दखल घेतली पाहिजे आणि चीनने नवीन गुंतागुंत निर्माण करण्याचे टाळावे असे आवाहनही त्यांनी केले.

या बैठकीत तणाव कमी करणे, सैन्य माघार घेणे, सीमांकन आणि विशेष प्रतिनिधी (एसआर) पातळीवरील चर्चा यावरही चर्चा झाली. (SCO)

यापुढे दोन्ही बाजूंनी सीमांवर शांतता राखणे आणि आंतरराष्ट्रीय संबंध वाढवणे हे केंद्रस्थानी असले पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. २०२० मध्ये पूर्व लडाखमधील लष्करी संघर्ष आणि गलवान खोऱ्यातील प्राणघातक संघर्षानंतर भारत आणि चीनमधील संबंध काहीसे गंभीर तणावाचे होते.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00