Home » Blog » Siddaramaiah got tempered: सिद्धरामय्यांनी उगारला पोलिस अधिकाऱ्यावर हात

Siddaramaiah got tempered: सिद्धरामय्यांनी उगारला पोलिस अधिकाऱ्यावर हात

काँग्रेसच्या आंदोलनस्थळी भाजपच्या निदर्शनामुळे संताप

by प्रतिनिधी
0 comments
Siddaramaiah got tempered

बेळगाव : प्रतिनिधी : महागाई आणि दरवाढप्रश्नी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेसने सोमवारी आंदोलन छेडले होते. आंदोलनस्थळी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी घुसून घोषणाबाजी केल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पोलीस अधिकाऱ्यावर हात उगारला आणि त्याला चांगलेच धारेवर धरले. तर महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनीही भाजप कार्यकर्ते आंदोलनस्थळी कसे आले, अशा शब्दांत पोलिस अधिकाऱ्याची खरडपट्टी काढली. ( Siddaramaiah got tempered)

केंद्र सरकारच्या धोरणामुळे महागाई वाढत आहे, असा आरोप करत काँग्रेस पक्षाने बेळगावात सीपीएड मैदानावर आंदोलन छेडले होते. या आंदोलनात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अनेक मंत्री सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असतानाच भाजप नेत्या शिल्पा केकरे यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेस आणि सिद्धरामय्या यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. ‘सिद्धरामय्या गो पाकिस्तान,’ अशा घोषणा दिल्या. यामुळे आंदोलनस्थळी एकच गोंधळ उडाला. महिला भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिस वाहन अडवण्याचा प्रयत्न केला. व्यासपीठावरून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर खाली उतरल्या. त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला धारेवर धरले. पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा आंदोलन सुरु झाले. ( Siddaramaiah got tempered)
पाकिस्तानशी युद्धाची गरज नाही, असे विधान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले होते. हे वृत्त मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यामुळे सर्वासामान्य जनतेतूनही सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या कारणामुळेच भाजप महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या आंदोलनस्थळी जात जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या भाषणात व्यत्यय आणला. यावेळी एकच गोंधळ उडाला. पोलिसांची धावपळ उडाली. पोलिसांनी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर जामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :
लोक मरत असतील तर महामार्गांचा उपयोग काय?
‘शरिया न्यायालया’ला कायदेशीर मान्यता नाही

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00