बडोदा : न्यूझिलंडविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत बडोदा येथे सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात भारतापुढे पाहुण्या संघाने ३०१ धावांचे आव्हान ठेवले आहे. न्यूझिलंडने ५० षटकात ८ बाद ३०० धावा केल्या. डेव्हॉन कॉनवे ५६, हेन्री निकोल्स् ६२ आणि मधल्या फळीतील डॅरियल मिचेलने ७१ चेंडूत ८४ धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराज, हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
डेव्हीन कॉनवे आणि हेन्री निकोल्स या सलामविरांनी पहिल्या गड्यासाठी शतकी भागिदारी केली. २० षटकात त्यांनी संघाचे शतक धावफलकावर लावले. हर्षित राणाने जोडी फोडताना निकोल्सला बाद केले. यष्टीरक्षक के.एल. राहूलने त्याचा झेल टिपला. ६९ चेंडूत आठ चेंडू सीमापार करत त्याने ६२ धावा केल्या. त्यानंतर राणाने कॉनवेचा त्रिफळा उडवला. सहा चौकार आणि एक षटकाराच्या सहाय्याने त्याने ५६ धावा केल्या. त्यानंतर विल यंग आणि डॅरियल मिचेल ही जोडी मैदानावर होती. पण विली यंगला मोहम्मद सिराजने बाद केले. तो १२ धावा करुन के.एल. राहूलकडे झेल देऊन तंबूत परतला. (New Zealand sets a target of 301 runs for India)
एकिकडे न्यूझिलंडच्या खेळाडूंची पडझड सुरू असताना डॅरियल मिचेलने जलद धावा करण्याचा सपाटा ठेवला होता. खराब चेंडूचा तो समाचार घेत होता. संघाची धावसंख्या १७९ वर असताना डावखुरा गोलंदार ग्लेन फिलिप्सला बाद केले. मिचेल हे ची बोल्ड प्रसिद्ध कृष्णा ने उडवली. त्याने १८ धावा केल्या. त्यानंतर न्यूझिलंडने २०० धावा पार केल्या. मिचेल ब्रेसवेला श्रेयस अय्यरच्या अचूक फेकीवर धावबाद झाला. त्यानंतर आलेला झॅकरे फाऊल्केस एक धावावर बाद झाला. ४८ व्या षटकात मिचेलची वेगवान खेळी प्रसिद्ध कृष्णाने संपुष्टात आणली. कृष्णाने त्याला पायचित पकडले. मिचेलने पाच चौकार, तीन षटकार ठोकत ८४ धावा चोपल्या. क्रिस्टेन क्लार्क आणि कायल जेमिनसनने संघाचे धावसंख्या ३०० धावांवर पोचवली. क्लाकने १७ चेंडूत २४ धावा चोपल्या. जेमिनसन आठ धावांवर नाबाद राहिला. (New Zealand sets a target of 301 runs for India)
न्यूझिलंडचे ३०० धावांचे आव्हान पार करण्यासाठी भारताची रोहित शर्मा आणि कर्णधार शुभन गिल ही जोडी मैदानात उतरली. रोहित शर्माने २९ चेंडूत धुवाँदार खेळ केली. त्याने तीन चौकार आणि दोन षटकार ठोकत २६ धावा केल्या. त्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहली या जोडीने भारताच्या डावाला आकार देत संघाचे शतक पार केले. २० षटकात भारताने १२२ धावा केल्या. शुभमन गिल ४० तर विराट कोहली ४५ धावा केल्या. (New Zealand sets a target of 301 runs for India)