Home » Blog » NHAI Toll: कमी टोल असलेल्या मार्गाची माहिती मिळणार

NHAI Toll: कमी टोल असलेल्या मार्गाची माहिती मिळणार

by प्रतिनिधी
0 comments
NHAI Toll

नवी दिल्ली : दोन ठिकाणांदरम्यान कमीत कमी टोल असलेल्या मार्गाची माहिती वाहनधारकांना मिळण्याची सुविधा लवकरच सुरू होणार आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या राजमार्गयात्रा अॅपमध्ये अशी सुविधा असणार आहे. (NHAI Toll)

राजमार्गयात्रा अॅप प्रवाशांना राष्ट्रीय महामार्गांबद्दलची सर्वंकष माहिती देते. तसेच यावर तक्रार निवारण यंत्रणेची सुविधाही देण्यात येत आहे. आता प्रवासादरम्यानच्या कमीत कमी टोल असलेल्या मार्गाची माहिती मिळण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी (IHMCL) च्या इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टम (ITS) चे मुख्य उत्पादन अधिकारी अमृत सिंघा म्हणाले की, समजा, दिल्लीहून लखनौला जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. तर हे अॅप या मार्गावरील कमीत कमी टोल असणारा मार्ग निवडण्यास मदत करेल.(NHAI Toll)

म्हणजे तुम्ही दिल्लीहून यमुना एक्सप्रेसवेने लखनौला जाऊ शकता किंवा गाझियाबाद-अलिगड-कानपूर-लखनऊ वा मुरादाबाद-बरेली-सीतापूर-लखनौ असाही मार्ग निवडू शकता. हे अॅप वाहनचालकांना दिल्ली आणि लखनौदरम्यान कमीत कमी टोल आकारणाऱ्या मार्गाबद्दल माहिती देईल, असे श्री. सिंघा म्हणाले.

प्रवेश नियंत्रित एक्स्प्रेस वेवर वाहनधालक बेकायदा घुसखोरी करीत असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. त्यांनी एनएचएआयच्या अॅडव्हान्स्ड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (एटीएमएस) द्वारे संकलित केलेल्या डेटाचा हवाला दिला. दुचाकी आणि तीन चाकी वाहनचालक प्रवेश-नियंत्रित दिल्ली-गुडगाव आणि द्वारका एक्सप्रेसवेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(NHAI Toll)

एटीएम नमुना डेटानुसार, २१ जून ते २३ जून दरम्यान अशी १.७३ लाख प्रकरणे झाली आहेत. त्यापैकी एक लाखाहून अधिक प्रकरणे बंदी घातलेल्या वाहनांशी संबंधित होती.

श्री. सिंघा म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेद्वारे बांदिकुई ते जयपूरला जोडणारा ६७ किमी लांबीचा मोठा रस्ता लवकरच सुरू करेल. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल.

एनएचएआय राजस्थानचे प्रादेशिक अधिकारी प्रदीप अत्री म्हणाले की, १,३६८ कोटी रुपये खर्चून बांधलेला हा नवीन चार-लेनचा प्रवेश-नियंत्रित बांदिकुई-जयपूर मार्ग जुलैच्या मध्यापर्यंत वाहतुकीच्या चाचण्यांसाठी खुला होण्याची अपेक्षा आहे.(NHAI Toll)

एनएचएआयचे व्यवस्थापक पुष्पेंद्र सिंह यांच्या मते, हा रस्ता सुमारे अडीच वर्षांत बांधण्यात आला आहे. त्यामुळे जुन्या दिल्ली-जयपूर महामार्गावरील वाहतुकीचा मोठा ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.

सध्या, दिल्लीहून जयपूरला जाण्यासाठी सुमारे ४ तास लागतात – दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेद्वारे बांदिकुईला जाण्यासाठी २.५ तास आणि शेवटचा ६७ किमी अंतर कापण्यासाठी आणखी १.५ तास लागतात. नवीन रस्त्यामुळे हा प्रवास सुमारे ३ तासांत पूर्ण होऊ शकतो.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00