Home » Blog » रक्षाविसर्जनाला कावळ्याची वाट पाहणाऱ्या पै पाहुण्यावर मधमाशांचा हल्ला

रक्षाविसर्जनाला कावळ्याची वाट पाहणाऱ्या पै पाहुण्यावर मधमाशांचा हल्ला

by प्रतिनिधी
0 comments
Honeybee Attack in Yelwade, Radhanagari

कोल्हापूर : प्रतिनिधी : रक्षाविसर्जनाला नैवेद्य शिवण्यासाठी कावळ्यांची वाट पाहणाऱ्या पै पाहुण्यांवर मधमाश्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात शंभरहून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यातील १२ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे. बुधवारी सकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील येळवडे गावात ही घटना घडली. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. (Honeybee Attack in Yelwade, Radhanagari)

मिळलेल्या माहितीनुसार येळवडे गावात मयत व्यक्तीच्या रक्षाविसर्जनाचा विधी होता. रक्षा विसर्जनासाठी गावकरी, नातेवाईक मोठ्या संख्येने स्मशानात जमले होते. रक्षाविसर्जन झाल्यावर कावळ्याने नैवेद्य शिवण्यासाठी सर्वजण वाट पहात होते. स्मशानजवळील झाडांवर कावळे जमा झाले होते. एका नारळ्याच्या झाडावर मधमाशाच्या पोळ्याला कावळ्याचा धक्का लागला. त्यामुळे खवळलेल्या मधमाशांनी स्मशानभूमीत जमलेल्या लोकांवर हल्ला चढवला.अचानक हल्ला झाल्याने लोक पळू लागले. काहींनी स्मशानाजवळील पोल्ट्री शेडचा आसरा घेतला. माशांनी हल्ला केल्याने १०० हून अधिक लोकांना मधमाशांना डंख मारला. जखमींना तातडीने राशिवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारास दाखल करण्यात आले. तसेच गंभीर जखमींना कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या १० ते १ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत. (Honeybee Attack in Yelwade, Radhanagari)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00