Home » Blog » EC replies Rahul: निवडणुका कायद्यानुसार : राहुल गांधी यांना उत्तर

EC replies Rahul: निवडणुका कायद्यानुसार : राहुल गांधी यांना उत्तर

by प्रतिनिधी
0 comments
EC replies Rahul

नवी दिल्ली : देशातील सर्व निवडणुका कायद्यानुसार घेतल्या जातात. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत हजारो कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. शिवाय राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या बूथ-लेव्हल एजंट यांचा समावेश असतो, यावरही निवडणूक आयोगाने भर दिला आहे. याशिवाय आणखी काही शंका असतील त्याचे निरसन केले जाईल, असे स्पष्ट आश्वासन केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिले आहे. (EC replies Rahul)

२०२४ च्या महाराष्ट्रातील निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप खासदार गांधी यांच्याकडून सातत्याने होतो. यासंबंधीचा एक विस्तृत लेखही त्यांनी एका आघाडीच्या दैनिकात लिहिला होता. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मंगळवारी (२४ जून) राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे.

गांधी यांना ईमेलद्वारे पाठवलेल्या पत्रात, निवडणूक आयोगाने म्हटले आहे की विधानसभा मतदारसंघ पातळीवर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया विकेंद्रित पद्धतीने पार पाडली जाते. यामध्ये आयोगाने नियुक्त केलेले १,००,१८६ हून अधिक बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ), २८८ निवडणूक नोंदणी अधिकारी (ईआरओ), १३९ सामान्य निरीक्षक, ४१ पोलिस निरीक्षक, ७१ खर्च निरीक्षक आणि २८८ निवडणूक अधिकारी (आरओएस) यांचा समावेश होता. (EC replies Rahul)

तसेच काँग्रेस पक्षांसह महाराष्ट्रातील २८,४२१ राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय पक्षांकडून १,०८,०२६ बूथ लेव्हल एजंट (बीएलए) नियुक्त केले जातात.

‘‘आम्हाला असे वाटते की निवडणुकांबाबतचा कोणताही मुद्दा काँग्रेस उमेदवारांनी सक्षम न्यायालयात (उच्च न्यायालयात) दाखल केलेल्या निवडणूक याचिकांद्वारे आधीच उपस्थित केला गेला असता,’’ असे आयोगाने खा. गांधी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. (EC replies Rahul) ‘‘तथापि, जर तुम्हाला अजूनही काही शंका असतील, तर तुम्ही आमच्याकडे त्या नोंदवू शकता. सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची आयोगाची तयारी आहे. आयोग परस्पर सहमतीने तारीख आणि वेळ ठरवेल, या दिवशी प्रत्यक्ष चर्चाही करेल, तशी आमची तयारी आहे,’’ असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा :
इराण इस्त्रायलमध्ये युद्धबंदी
तेलाच्या किमती घसरल्या

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00