Home » Blog » Raut criticized Shaha : राऊत यांच्याकडून ‘बोलबच्चन’ वक्तव्याचा समाचार

Raut criticized Shaha : राऊत यांच्याकडून ‘बोलबच्चन’ वक्तव्याचा समाचार

by प्रतिनिधी
0 comments
Raut criticized Shaha

मुंबई : प्रतिनिधी : खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ‘बोलबच्चन’ टीकेचा चांगलाच समाचार घेतला. राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.  (Raut criticized Shaha)

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता ‘बोलबच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही’ अशी टीका केली होती.  त्यावर बोलताना राऊत म्हणाले, “आम्हाला कोणी बोलबच्चन म्हणत असेल तर ही प्रेरणा आम्ही मोदींपासून घेतली आहे. मोदी हे जगातील समस्त बोलबच्चन महामंडळ, संघटनांचे अध्यक्ष आहेत. स्वत: फडणवीस ज्युनिअर बोलबच्चन आहेत. त्यांना ते जमत नाही, आणि ते रोज उघडे पडत आहेत. मोदीही रोज उघडे पडायला लागले आहेत. लोक त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. काल अमेरिकिचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आठऱ्याव्या वेळा सांगितले की भारत पाकिस्तानमधील युद्धी मी थांबवले. तरीही मोदी याबाबत चकार शब्द काढत नाहीत. (Raut criticized Shaha)

अमित शहांवरही टीका     

अमित शहा मराठी माणसाची जी एकजूट फोडण्याचा प्रयत्न केला त्या जखेवर मीठ चोळण्यासाठी ते महाराष्ट्रात येतात, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. केंद्रीय मंत्री अमित शहा काल शुक्रवारी मुंबई दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी एकनाथ शिंदे ही खरी शिवसेना आहे असा दावा केला होता. त्यांच्या दाव्याचा खासदार राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. एकनाथ शिंदे गट खरी शिवसेना म्हणजे अमेरिकेतील रिपब्लिकन पक्ष रामदास आठवले यांचा आहे असे म्हणण्यासारखे आहे, असा जोरदार घणाघात राऊत यांनी केला. (Raut criticized Shaha)

अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेनाची हीच खरी शिवसेना हे वक्तव्य करुन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला. मराठी एकजुटीचा, मराठा माणसाचा अपमान केला आहे असा आरोप राऊत यांनी केला. एकनाथ शिंदे हा गट अमित शहा यांच्या मालकीचा आहे हे शिंदेने वारंवार सिद्ध केले आहे. त्यामुळे अमित शहा अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत. अमित शहांनी अनेक प्रयोग करुनही शिवसेना उभी आहे याचे अमित शहा यांना नैराश्य आले आहे. एकनाथ शिंदे यांनी काय सिद्दा केले आहे असा प्रश्न करुन शिंदेची ओळख ही लिंबू मिरची उप मुख्यमंत्री आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. (Raut criticized Shaha)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00