Home » Blog » फोंड्या माळावर एक किलोमीटर रस्ता करण्यासाठी २५४ कोटी रुपये?

फोंड्या माळावर एक किलोमीटर रस्ता करण्यासाठी २५४ कोटी रुपये?

by प्रतिनिधी
0 comments
254 crore for constructing a one-kilometer road

कोल्हापूर : प्रतिनिधी : महायुती सरकारने शक्तीपीठ महामार्गाचे नवीन आराखडा जाहीर केला आहे. आता हा मार्ग सातारा जिल्ह्यातून जाणार आहे. तसेच प्रकल्पाचा खर्च वाढला आहे. त्यावर टीका करताना खासदार राजू शेट्टी यांनी सातारा जिल्ह्यातील माण खटाव भागातील फोंड्या माळावर एक किलोमीटर रस्ता करण्यासाठी २५४.५४ कोटी कशाला लागतात? असा प्रश्न उपस्थित केला आहे. महायुती सरकार हा महामार्ग करुन जनतेच्या खिशावर दरोडा घालत आहे, असा आरोपही शेट्टी यांनी केला आहे. (254 crore for constructing a one-kilometer road)

माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरवातीला ८०२ किलोमीटर लांबीचा ८६ हजार कोटींचा शक्तीपीठ महामार्ग जाहीर केला. संपूर्ण राज्यातील या महामार्गाचा एक किलोमीटरचा खर्च १०७ कोटी २३ लाख रूपये होता.  आता देवेंद्र फडणवीस यांनी हा महामार्ग माण- खटाव मार्गे वाढवून तो ८५६.९४ किलोमीटर म्हणजेच ५४.९४ किलोमीटर इतके अंतर वाढवून आता या महामार्गाचा खर्च एक लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचवला आहे. (254 crore for constructing a one-kilometer road)

शक्तीपीठ महामार्गातील वाढीव ५४.९४ किलोमीटर रस्त्यासाठी १४ हजार कोटी रूपयांनी जादा प्रकल्प खर्च वाढला आहे. थोडक्यात माण -खटाव या माळरानावरून जाणा-या रस्त्याच्या एक किलोमीटर रस्त्यासाठी तब्बल २५४.५४ कोटी रूपये इतका खर्च केला जाणार आहे.

वाढलेल्या खर्चाबाबत राजू शेट्टी यांनी “देवाभाऊ फोंड्या माळावर तुम्ही एक किलोमीटर रस्त्यासाठी २५४.५४ कोटी रूपये खर्च करत आहात नेमका हा महामार्ग ट्रम्प तात्यांचा डॅालर रस्त्यावर टाकून महामार्ग बनविणार आहात काय ?” असा सवाल केला आहे.  तुमची भ्रष्ट्राचारी महत्वाकांक्षा इतकी वाढली आहे की या प्रकल्पातून ७० हजार कोटी रूपयाचा ढपला पाडण्यासाठी तुम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या खिशावर दरोडा टाकत आहात. कारण हा सारा पैसा जनतेने व्याजासहित टोल रूपाने परत करायचा आहे, अशी टीकाही शेट्टी यांनी केली आहे. (254 crore for constructing a one-kilometer road)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00