Home » Blog » देशात दलितांसोबत भेदभाव : राहूल गांधी

देशात दलितांसोबत भेदभाव : राहूल गांधी

by प्रतिनिधी
0 comments
Rahul Gandhi criticizes discrimination against Dalits

नवी दिल्ली : देशात  आजही दलितांसोबत भेदभाव केला जात आहे असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केला. उत्तराखंड राज्यातील हल्दानी येथे राष्ट्रीय कॉग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर केलेल्या कथित शुद्धिकरण विधीवरुन राहूल गांधींनी भाजप आणि आरएसएस वर टीका केली.  शुद्धिकरण विधी करणाऱ्यावर पंतप्रधानांनी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. (Rahul Gandhi criticizes discrimination against Dalits)

शुद्धिकरण हे अस्पृश्यतेचे दुसरे नाव

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर उत्तराखंडध्ये हल्दानी येथे शुद्धिकरण विधी केला. त्यावर राहूल गांधी म्हणाले, खर्गे यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी आणि संविधानासाठी दिले आहे. हल्दानी येथे झालेल्या भाषणानंतर सभेच्या जागी शुद्धिकरण करण्यात आले. आठ ऑगस्टला खरगे रॅली करताना आणि १० ऑगस्टला भाजप आणि आरएसएसचे कार्यकर्ते तिथे जाऊन शुद्धिकरण करतात. हा संविधानानुसार गुन्हा आहे. शुद्धिकरण हे अस्पृश्यतेचे दुसरे नाव आहे. संविधानाने अस्पृश्यता बेकायदेशीर ठरवली असताना हे लोक जाहीरपणे आचरण करत आहेत. शुद्धिकरण करुन हे संदेश देत आहेत की दलित घाणेरडे आहेत. त्यांना स्पर्श करु नये हा संविधानानुसार गुन्हा आहे. (Rahul Gandhi criticizes discrimination against Dalits)

शुद्धिकरण करणाऱ्यावर पंतप्रधानांनी गुन्हा दाखल करण्याचा आदेश द्यावा

राहूल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक जातीचे आहेत असे ते म्हणतात. पण त्यांच्याच पक्षाचे नेते उघडपणे म्हणतात की शुद्धिकरण करण्यात काहीच गैर नाही. शुद्धिकरण करणे गुन्हा आहे पण अजुनही त्यावर कारवाई झालेली नाही. शुद्धिकरण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा आणि तसा आदेश पंतप्रधानांनी द्यावा, अशी मागणी राहूल गांधींनी केली. (Rahul Gandhi criticizes discrimination against Dalits)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!