Home » Blog » BCCI Tribute : पहेलगाममधील मृतांना आयपीएलमध्ये श्रद्धांजली

BCCI Tribute : पहेलगाममधील मृतांना आयपीएलमध्ये श्रद्धांजली

मुंबई-हैदराबाद सामन्यामध्ये चिअरलीडर्स, आतषबाजी नाही

by प्रतिनिधी
0 comments
BCCI Tribute

हैदराबाद : पहेलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये बळी पडलेल्यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) बुधवारी (२३ एप्रिल) आयपीएल सामन्यादरम्यान श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. मुंबई इंडियन्स व सनरायझर्स हैदराबाद संघांदरम्यान होणाऱ्या या सामन्यामध्ये खेळाडू दंडाला काळी फित बांधून खेळतील. त्याचप्रमाणे, या सामन्यात दोन्ही संघांच्या चिअरलीडर्स नसतील, तसेच आतषबाजीही करण्यात येणार नाही. (BCCI Tribute)

हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या सामन्यापूर्वी मिनिटभराची शांतता पाळण्यात येईल. नाणेफेकीवेळी दोन्ही संघांचे कर्णधार हल्ल्याचा निषेध करतील. सर्व खेळाडू व सपोर्ट स्टाफ दंडावर काळ्या फिती बांधणार आहेत. या काळ्या फिती बांधण्याचे महत्त्व प्रेक्षकांना समजावून देण्याच्या सूचना समालोचकांना करण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी, बीसीसीआयचे सचिव देवाजीत सैकिया यांनी बुधवारी निवेदन प्रसिद्ध केले. (BCCI Tribute)

“क्रिकेटविश्वाला या हल्ल्याचे दु:ख असून पहेलगाममधील घृणास्पद हल्ल्यात प्राण गमवावे लागलेल्यांच्या नातेवाईकांप्रती आम्हाला सहवेदना आहे. बीसीसीआय कठोर शब्दांत या हल्ल्यांचा निषेध करत आहे. मृतांच्या नातेवाईकांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असे सैकिया यांनी म्हटले आहे. (BCCI Tribute)

हेही वाचा :
दहशतवाद, धर्म आणि राजकारण
जगभरातून दहशतवादी हल्ल्याचा निषेध
आठवड्यापूर्वीच लग्न आणि…

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00