Home » Blog » Jay Pawar Marriage कोण आहे, अजितदादांची होणारी सून ऋतुजा ?

Jay Pawar Marriage कोण आहे, अजितदादांची होणारी सून ऋतुजा ?

येत्या दहा एप्रिल रोजी अजितदादांचे पुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा पुणे येथे होणार आहे.

by प्रतिनिधी
0 comments

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचे पुत्र जय यांच्या लग्नाच्या बातमीची चर्चा राजकीय-सामाजिक वर्तुळात सुरू झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी समाजमाध्यमावर कौटुंबिक फोटो शेअर करून या लग्नाची खबर दिली आहे. अजितदादांची होणारी सून नेमकी कोण आहे, याची उत्सुकता त्यामुळे निर्माण झाली आहे. (Jay Pawar Marriage)

दहा एप्रिलला साखरपुडा

मिळालेल्या माहितीनुसार येत्या दहा एप्रिल रोजी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा पुणे येथे होणार आहे. ऋतुजा पाटील आणि जय पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि प्रतिभाताई पवार यांची गुरुवारी सायंकाळी पुणे येथे भेट घेऊन आशीर्वाद घेतले, त्यावेळी पवार कुटुंबातील अनेक लोक उपस्थित होते. सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भातील छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली. लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीनंतर पवार कुटुंबात फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. या विवाह समारंभानिमित्त पवार कुटुंबीय पुन्हा एकत्र येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. (Jay Pawar Marriage)

अजितदादांचे व्याही प्रवीण पाटील

अजितदादांचे व्याही प्रवीण पाटील हे इलेव्हेट एज कन्सल्टिंग ग्रूपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्सचे सरव्यवस्थापक, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे वरिष्ठ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, स्टारकेन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, हिरो सायकल्सचे अध्यक्ष, सिम्बायोसिस इन्स्टिट्यूटचे सल्लागार मंडळाचे सदस्य अशा विविध पदांवर त्यांनी काम पाहिले आहे. प्रवीण पाटील यांच्या पत्नी सौ. पल्लवी पाटील या फलटण तालुक्यातील सहकारमहर्षी दिवंगत हणमंतराव पवार यांच्या कन्या होत. (Jay Pawar Marriage)

हणमंतराव पवारांची नात

हणमंतराव पवार हे फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील पवारवाडी (आसू) गावचे सुपुत्र. तालुक्यात सहकाराचा पाया मजबूत करण्यासाठी सुमारे चाळीस वर्षांपूर्वी त्यांनी अथक प्रयत्न केले. साखर कारखाना, दूध संघ, ग्रामपंचायत, खरेदी-विक्री संघ, श्रीराम बझार, शिवनेरी कुक्कुटपालन संस्था अशा विविध संस्था त्यांनी सुरू केल्या. श्रीराम साखऱ कारखान्याचे अध्यक्ष असताना त्यांनी सिंचनासाठी मोठे काम केले. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यासह बड्या राजकीय नेत्यांशी त्यांचे निकटचे संबंध होते. (Jay Pawar Marriage)

अजितदादा पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांची सून होणारी ऋतुजा ही हणमंतराव पवार यांची नात म्हणजे त्यांच्या मुलीची मुलगी.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00