नवी दिल्ली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेच्या सभागृहात आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसने दोन स्वतंत्र विशेषाधिकार नोटिसा बजावल्या आहेत. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी लोकसभेत तर राज्यसभेत विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नोटीस दिली आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी गुरुवारी एकत्र येत अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (Amit Shah)
संसदेबाहेबर इंडिया आघाडीतील खासदारांनी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. समाजावादी पक्षाचे खासदारही यामध्ये लाल टोप्या परिधान करून सहभागी झाले होते. यावेळी राहुल गांधी यांनी नेहमीचा पांढरा शर्ट परिधान करण्याऐवजी निळा टी शर्ट परिधान केला होता.
राम गोपाल यादव यांच्यासह सपा खासदार लाल टोप्या घालून संसद आवारात स्वतंत्र निदर्शने करत होते. राहुल गांधी यांनी त्यांच्याशी हस्तांदोलन केले. त्यानंतर इंडिया आघाडीच्या आंदोलनाच्या ठिकाणी एकत्र आले. (Amit Shah)
दरम्यान, त्याच वेळी, तृणमूल काँग्रेसने त्यांच्या एका व्हॉट्सॲप ग्रुपवर वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे नेते डेरेक ओब्रायन यांचे आभार मानले. बाबासाहेबांबद्दल अवमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल शाह यांच्याविरुद्ध विशेषाधिकार नोटीस दिल्याबद्दल प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचे आभार मानल्याची ट्विट तृणमूलने पोस्ट केली.
आम आदमी पार्टी (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी टीडीपी प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहून शाह यांनी देशभरातील लाखो लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. बाबासाहेबांना मानणारे आता भाजपला साथ देऊ शकत नाहीत, असे लोकांना वाटू लागले आहे,’असे म्हटले आहे.
बाबासाहेब केवळ एक नेतेच नाहीत तर ते राष्ट्राचा आत्मा आहेत. भाजपने त्यांच्याविरोधात विधान केले आहे. आआ तरी तुम्ही या विषयावर सखोल चिंतन कराल, अशी लोकांची अपेक्षा आहे, असे केजरीवाल यांनी नायडू आणि नितीश यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. (Amit Shah)
अदानीवरून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न
दरम्यान, नरेंद्र मोदी यांचे मित्र गौतम अदानी यांच्याविरोधात अमेरिकेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोदी या आपल्या मित्रांना हिंदूस्थान विकू पाहत आहेत, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यावर चर्चा झाली पाहिजे, अशी आमची महत्त्वाची आणि प्रमुख मागणी आहे. मात्र मोदी-शाह यांना त्यावर चर्चा नको आहे. त्यामुळे मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलीत करण्याचे प्रयत्न सुरू आहे. गृहमंत्री अमित शाह यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वक्तव्य आणि गुरुवारी सकाळी संसदेबाहेर झालेली धक्काबुक्की हे त्या प्रयत्नाचेच भाग आहेत, असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी केला.
LIVE: Press Conference | AICC HQ, New Delhi https://t.co/OkNrmTKhyX
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 19, 2024
हेही वाचा :
- राम शिंदे यांची विधान परिषद सभापतीपदी निवड
- नौदल स्पीड बोटच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू
- घर, गोठा बांधताना अडचणी, तुकडाबंदीची अट शिथिल करा