Home » Blog » आयपीएलचा पहिला सामना आरसीबी विरुद्ध् एसआरएच

आयपीएलचा पहिला सामना आरसीबी विरुद्ध् एसआरएच

by प्रतिनिधी
0 comments
IPL 1st match RCB vs SRH

नवी दिल्ली : भारतीय किकेट नियामक मंडळाने इंडियन प्रिमियर लिग २०२६ हंगामाच्या पहिल्या वीस दिवसाचे वेळपत्रक जाहीर केले आहे. पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हेद्राबाद यांच्यात बेंगळुरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आयपीएलच्या काळात तीन राज्यामध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. (IPL 1st match RCB vs SRH)

पहिल्या टप्प्यातील वीस सामने बेंगळुरु, मुंबई, गुवाहाटी, न्यू चंदीगड, लखनौ, कोलकोता, चेन्नई, दिल्ली, अहमदबाबद आणि हैद्राबाद येथे खेळवण्यात येणार आहेत. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी साडेतीन आणि रात्री साडेसात वाजता सामने सुरू होणार आहेत. हंगामातील पहिला डबल हेडर सामना चार एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स संघात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दुपारी होणार आहे. त्यानंतर गुजरात टायटन्स आणि रायस्थान रॉयल्स यांच्यातील सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. (IPL 1st match RCB vs SRH)

सामन्यांचे वेळापत्रक असे,  आरसीबी विरुद्ध एसआरएच २८ मार्च- संध्याकाळी. बेंगळुरू एमआय विरुद्ध केकेआर २९ मार्च संध्याकाळी.  मुंबई आरआर विरुद्ध सीएसके ३० मार्च संध्याकाळी. गुवाहाटी पीबीकेएस विरुद्ध जीटी ३१ मार्च संध्याकाळी  मुल्लानपूर. एलएसजी विरुद्ध डीसी १-एप्रिल संध्याकाळी लखनौ. केकेआर विरुद्ध एसआरएच २-एप्रिल संध्याकाळी कोलकाता. सीएसके विरुद्ध पीबीकेएस ३-एप्रिल संध्याकाळी चेन्नई.  डीसी विरुद्ध एमआय ४-एप्रिल दुपारी दिल्ली.  जीटी विरुद्ध आरआर ४-एप्रिल संध्याकाळी अहमदाबाद.  एसआरएच विरुद्ध एलएसजी ५ एप्रिल दुपारी हैदराबाद. आरसीबी विरुद्ध सीएसके ५ एप्रिल संध्याकाळी बेंगळुरू. केकेआर विरुद्ध पीबीकेएस ६ एप्रिल संध्याकाळी कोलकाता. आरआर विरुद्ध एमआय ७ एप्रिल संध्याकाळी गुवाहाटी. डीसी विरुद्ध जीटी ८ एप्रिल २६ संध्याकाळी दिल्ली. केकेआर विरुद्ध एलएसजी ९ एप्रिल गुरुवार संध्याकाळी कोलकाता. आरआर विरुद्ध आरसीबी १० एप्रिल संध्याकाळी गुवाहाटी. पीबीकेएस विरुद्ध एसआरएच ११ एप्रिल दुपारी मुल्लानपूर. सीएसके विरुद्ध डीसी ११ एप्रिल संध्याकाळी चेन्नई. एलएसजी विरुद्ध जीटी १२ एप्रिल दुपारी लखनौ. एमआय विरुद्ध आरसीबी १२ एप्रिल संध्याकाळी मुंबई. (IPL 1st match RCB vs SRH)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00