Home » Blog » मतदार यादीत आमदारांचे ७ वेळा तर माजी महापौराचे ८ वेळा नाव

मतदार यादीत आमदारांचे ७ वेळा तर माजी महापौराचे ८ वेळा नाव

by प्रतिनिधी
0 comments
Names of 33 thousand new voters inserted

जमीर काझी :  मुंबई: देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील  २०  नोव्हेंबरला मुंबईतील महापालिकेची जी प्रारूप मतदार यादीतील आणखी मोठा घोळ शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी समोर आणला आहे. आमदार सुनील शिंदे यांचे सात वेळा माजी महापौर श्रद्धा जाधव यांचे नाव आठ वेळा आले आहे. अनेक मृताची नावे घुसडली असून ३३ हजार नवमतदारांची नावे घुसडली आहेत, असा आरोप आमदार अदित्य ठाकरे यांनी केला आहे.  निवडणूक आयोग तुम्ही सर्कस करत आहात का? असा सवालही त्यांनी केला. (Names of 33 thousand new voters inserted)

  आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल करताना त्याच्याविरुद्ध न्यायालयीन लढाई बरोबरच जनचळवळ उभी करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ‘२० नोव्हेंबरला मुंबई प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीतील घोळाबद्दल चार हजारावर हरकती नोंदविल्या आहेत. आयोगाकडून १४ लाख दुबार मतदार कधी काढणार?, आमचे आमदार सुनील गोविंद शिंदे यांचे यादीत सात वेळा नाव आहे.त्यामध्ये वय, फोटो वेगळे आहेत. तर श्रद्धा जाधव यांचे नाव आठ वेळा आहे. ज्योती गायकवाड आणि अनिल देसाई यांचे नाव सुद्धा दुबार मतदारांमध्ये आले आहे. दुबार मतदारांमध्ये मराठी मतदारांची नावे अधिक आहेत. पुढचे दोन दिवस अजून आमच्याकडे आहे. जे लोक मतदार तपासणी करत आहेत. त्यांना यादी वाचता येत नाही, असे लोक येत आहेत. ही थट्टा करत आहात, तुम्ही सर्कस करत आहात. हा घोळ तुम्हीच घातलेला आहे, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला.  (Names of 33 thousand new voters inserted)

यादीमध्ये ३३ हजार नवे मतदार

 आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, ५ लाख ८६ हजार लोकांची दुबार मतदार म्हणून नोंदणी आहे. आता असे काही लोक आहेत जे दुबार आहे. पण त्यांच्या समोर स्टार नाही. मृत मतदारांचे डेथ सर्टिफिकेट देऊन सुद्धा मतदार यादीत त्यांचे नावं आहे. त्यांच्या नावावर कोणी प्रॉक्सि वोटिंग करतंय का? या सगळ्याचे उत्तरं देणार कोण? आम्ही पत्र तर दिले आहे. पण, एक चळवळ आम्ही यासाठी उभी करू. १ जुलै २०२५ नंतर एकही मतदार यादीमध्ये येऊ शकत नाही. पण, आता या यादीमध्ये ३३ हजार मतदार हे नव्याने आले आहेत, असा आरोप केला. (Names of 33 thousand new voters inserted)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00