Home » Blog » शिवाजी विद्यापीठाच्या वैष्णवी रावळची आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

शिवाजी विद्यापीठाच्या वैष्णवी रावळची आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

by प्रतिनिधी
0 comments
Vaishnavi Raval selected international competition China

कोल्हापूर : प्रतिनिधी : चीन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाची खेळाडू वैष्णवी राजेंद्र रावळ हिची भारतीय संघात निवड झाली.  कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते वैष्णवीचा सत्कार करण्यात आला. वैष्णवी आता आंतरराष्ट्रीय सराव शिबिराकरिता बंगळुरूला रवाना होणार आहे. (Vaishnavi Raval selected international competition China)

 चीनमध्ये २३ वर्षाखालील ॲथलेटिक्स स्पर्धा ९ ते १२ जुलै २०२६ दरम्यान होणार आहे. या स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाची खेळाडू वैष्णवी राजेंद्र रावळ ( शिवराज महाविद्यालय, गडहिंग्लज) हिची भारतीय संघात निवड झाली आहे. वैष्णवीचा संपूर्ण सराव शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकवर झाला आहे. गतवर्षी तिने विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले आहे. शिवाजी विद्यापीठाने या वर्षी वैष्णवीला स्पोर्ट्स स्कॉलरशिपही दिली आहे.

 तिच्या या निवडीबद्दल कुलगुरू डॉ.राजनीश कामत यांच्या हस्ते तसेच प्र – कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, सचिव डॉ. अनिल कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, डॉ. राहुल मगदूम यांच्या उपस्थितीत सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. (Vaishnavi Raval selected international competition China)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00