नागपूर : प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथम नागपूरचे हिवाळी अधिवेशन विधानसभा आणि विधान परिषदेला विरोधी पक्षनेत्याशिवाय सुरू झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा चेंडू विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभपतींच्या कोर्टात टोलवला आहे. तर शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी अदित्य ठाकरेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट आग्रही असल्याचे सांगून भास्कर जाधव यांना विरोधी पक्ष मिळणार नाहीत अशा खेळी सुरू असल्याची पुडी सोडली आहे.
राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही विधानसभेत विरोध पक्षनेता नेमलेला नाही. तर विधान परिषदेतून अंबादास दानवे यांची आमदारकीची मुदत संपल्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उप मुख्यमंत्रीपद हे घटनाबाह्य असल्याचे सांगत रद्द करण्याची मागणी केली आहे. आमदार अदित्य ठाकरेही यांनीही टीका करताना भारतीय जनता पक्षाकडे संख्याबळ असताना दोन बोगस पदे कशाला निर्माण केली असा सवाल केला आहे. भाजपचा अनाकोंडा आणि त्यांचे दोन विषारी साप यांची वृत्ती सगळं ढापायचं आणि गिळायचं अशी आहे अशी टीका केली. (The post of Leader of Opposition is vacant in the winter session)
ठाकरे पिता पुत्रावर टीका करताना विरोधी पक्षनेतेपदासाठी अदित्य ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव दिल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. तर आमदार निलेश राणे यांनी जोपर्यंत दोन्ही ठाकरे सभागृहात आहेत तोपर्यंत भास्कर जाधव विरोधी पक्षनेता होणार नाहीत. सत्ताधाऱ्यांच्या वक्तव्यावर अदित्य ठाकरे म्हणाले, या पेरलेल्या बातम्या आहेत, अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका. विरोधी पक्षनेतेपदासाठी स्वत:च्या नावाची चर्चा अदित्य ठाकरे यांनी फेटाळून लावली. (The post of Leader of Opposition is vacant in the winter session)
विरोधी पक्षपदाचे दावेदार आमदार भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी १० टक्के सदस्याची अट कायद्यात कुठेही नाही. भाजप सरकारने सौजन्य आणि लोकशाहीवर विश्वास नाही, अशी टीका केली आहे. विधीमंडळाच्या कोणत्या नियमांमध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी दहा टक्के सदस्यांची अट आहे हे सरकारने दाखवून द्यावे, असेही भास्कर जाधव म्हणाले. दिल्लीमध्ये आम आदमी सरकार असताना भाजपकडे दहा टक्के सदस्य नसताना विरोधी पक्षनेतेपद मिळाले होते. याकडे त्यांनी लक्ष वेधले. (The post of Leader of Opposition is vacant in the winter session)