Home » Blog » मंत्री गोगावलेंच्या मुलाला अटक का होत नाही? : संजय राऊत यांचे आरोप

मंत्री गोगावलेंच्या मुलाला अटक का होत नाही? : संजय राऊत यांचे आरोप

by प्रतिनिधी
0 comments
Why hasn't Minister Gogawale's son been arrested

मुंबई : प्रतिनिधी : उच्च न्यायालयाने मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाचा अर्ज फेटाळला असताना त्याला अटक का होत नाही असा सवाल करत मंत्र्याच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे गृहखाते अभय देते, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. (Why hasn’t Minister Gogawale’s son been arrested)

महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत मंत्री भरतशेठ गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले आणि राष्ट्रवादीच्या सुशांत जाबरे यांच्यात जोरदार राडा झाला. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात विकास गोगावले फरार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने विकास गोगावले यांचा जामिन अर्ज फेटाळला आहे. तरीही त्याला अटक का केली नाही? मंत्र्याच्या मुलावर कारवाई का होत नाही? असा सवाल राऊत यांनी केला. मंत्र्यांच्या मुलांनी खून केले, दरोडा टाकला तरी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि पोलिसांकडून अभय दिले जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला. (Why hasn’t Minister Gogawale’s son been arrested)

विधानसभेत मी कोणलाही सोडणार नाही असे भाषण फडणवीस यांनी दिले होते. मंत्र्यांची मुलं, त्यांचे भाऊ, बाप कसे सुटतात. साताऱ्यातील ड्रग कारखान्याचे काय झाले हे फडणवीस यांना माहीत आहे. या प्रकरणातील संबधित मंत्री फडणवीसांसमोर गुडख्यावर बसले आहे. एकनाथ शिंदे यांच्या भावाची ती जागा आहे. तसेच एका माजी पोलिस अधिकाऱ्याचा ड्रग कारखान्यामध्ये समावेश आहे, असा आरोपही राऊत यांनी केला. (Why hasn’t Minister Gogawale’s son been arrested)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00