Home » Blog » Naxalite leader Bhupati : नक्षली नेता भूपतीसह ६० जण शरण

Naxalite leader Bhupati : नक्षली नेता भूपतीसह ६० जण शरण

by प्रतिनिधी
0 comments
Naxalite leader Bhupati

गडचिरोली : नक्षली चळवळीतील मोठा नेता मल्लोजूला वेणूगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती त्याच्या ६० सहकाऱ्यांसह शरण आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली पोलिसांसमोर भूपती शरण आला. माओवादी पॉलिट ब्युरो मेंबर आणि सेंट्रल कमिटी मेंबर असलेल्या भूपतीवर सहा कोटींचे बक्षिस होते.  गेले काही दिवस गडचिरोली पोलिसांकडून भूपती शरण यावा यासाठी प्रयत्न होत होते. माओवाद विरोधातील लढाईतील आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मिळाले आहे. (Naxalite leader Bhupati)

गडचिरोलीतील नक्षलवाद संपुष्टात !

केंद्र आणि राज्य सरकारकडून संयुक्तपणे नक्षलीविरोधात गेली काही वर्षे तीव्र मोहिम उघडली आहे. नक्षली चळवळीतील अनेक नेते मारले गेले आहेत. काही जणांनी शरणागती स्वीकारली आहे. सोनू उर्फ भूपतीने गेली काही दिवस शरण येण्याची भाषा सुरू केली होती. युद्धबंदी आणि चर्चा करण्यासह शस्त्रे टाकण्यासंदर्भात त्याने विधाने केली होती. त्यावर नक्षलवाद्यांच्या नेतृत्वाने त्याच्यावर टीका केली होती. त्यामुळे माओवादी चळवळीत फूट पडली असल्याची चर्चा आहे. भूपती शरण आल्याने गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद जवळजवळ संपुष्टात आल्याचे सांगितले जाते. गेल्या वीस वर्षात ७०० हून अधिक नक्षलवादयांनी आत्मसमर्पण केले आहे. (Naxalite leader Bhupati)

जहाल नेता म्हणून भूपतीची ओळख

पोलिसांच्या माहितीनुसार भूपती हा नक्षलवादी संघटनेतील दुसऱ्या क्रमांकाचा नेता होता. १९७० मध्ये माओवादी संघटना पीपल्स वॉर ग्रुपमध्ये प्रवेश करणाऱ्या भूपतीची कारकीर्द गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात सुरू झाली. तो नक्षलवादी नेता मल्लोजुला कोटेश्वररराव उर्फ किशनचा छोटा भाऊ आहे. त्याचे बीकॉम पर्यंत शिक्षण झालेला भूपती  नक्षलवादी चळवळीतील बौद्धिक चेहरा म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक हिंसक घटनांमध्ये त्याने भूमिका बजावली आहे. नक्षली जहाल नेता अशी त्याची ओळख होती.  नक्षलवादी संघटनेच्या स्थानिक पातळीपासून केंद्रीय समितीपर्यंत बांधणी करण्यात त्याने मोठी भूमिका बजावली आहे. गडचिरोलीसह छत्तीसगड, तेलंगणा, ओडिसा आणि आंध्र प्रदेश या राज्याची त्याच्याकडे जबाबदारी होती.  (Naxalite leader Bhupati)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00