Home » Blog » कोल्हापूर जिल्ह्यातील १२१ उमेदवारांचे भवितव्य आज होणार बंद

कोल्हापूर जिल्ह्यातील १२१ उमेदवारांचे भवितव्य आज होणार बंद

कोल्हापूर जिल्ह्यातील १२१ उमेदवारांचे भवितव्य आज होणार बंद

by प्रतिनिधी
0 comments
Kolhapur

कोल्हापूर : सार्वत्रिक विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे मतदान आज पार पडत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार व अपक्षांसह तब्बल १२१ उमेदवारांचे भवितव्य आज पेटीबंद होणार आहे. जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघातील जवळपास ३३ लाख मतदार आज मतदानातून आपली लोकशाहीची ताकद दाखवणार आहेत.

आज बुधवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत ३ हजार ४५२ केंद्रांवर हे मतदान होणार असून त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्ह्यात राजकीय मतदान चुरशीचे होणार अशी परिस्थिती होती. दर वर्षीच्या निवडणुकीपेक्षा यावेळी ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे. महाविकास आघाडीच्या सत्तेच्या अडीच वर्षानंतर राज्यात झालेल्या सत्तानाट्यांमुळे आताच्या निवडणुकीला महत्त्व आले आहे.

गेली महिनाभर उडालेला प्रचाराचा धुरळा अनेक कारणांनी गाजला. यात नेत्यांच्या वेगवेगळ्या विधानांनी कळस गाठला. अनेक मुद्दे चर्चेला आले. सत्ताधाऱ्यांनी केलेली कामे, शासनाच्या विविध योजना यांनी मैदाने मारली तर विरोधकांनी यातील चुका आणि आपले व्हिजन याचा मुद्दा पुढे आणला. यामुळे आरोप-प्रत्यारोप यांनी कळस गाठला. परिणामी, आजच्या मतदानातून लोक कुणाच्या बाजूने कौल देणार आहेत ते कळणार आहेत.

शनिवारी ता.२३ ला मतमोजणी सकाळी आठ वाजता ज्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी होणार असून, दुपारपर्यंत गुलालाचे मानकरी ठरतील.असा अंदाज आहे.

  • आज मतदान : बुधवार २० नोव्हेंबर
  • वेळ : सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत
  • एकूण केंद्रे : ३४५२
  • एकूण उमेदवार : १२१

जिल्ह्यात १०, महिला, १० दिव्यांग केंद्रे

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक मतदारसंघात एक याप्रमाणे १० पिंक मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर सर्व अधिकारी, कर्मचारी महिला असतील. तसेच १० दिव्यांग केंद्रे आहेत. एकूण १६ हजार २३७ अधिकारी, कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत आहेत.

  • जिल्ह्यातील एकूण मतदार : ३३ लाख ०५ हजार ०९८
  • पुरुष मतदार : १६ लाख ६९ हजार २७०
  • महिला मतदार : १६ लाख ३५ हजार ६४२
  • तृतीयपंथी : १८६

सर्वाधिक मतदार दक्षिणमध्ये

जिल्ह्यात सर्वाधिक ३ लाख ७२ हजार ६८४ मतदार कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात आहेत. सर्वात कमी मतदार कोल्हापूर उत्तरमध्ये ३ लाख १ हजार ७४३ आहेत. चंदगड, कागल आणि कोल्हापूर उत्तरमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या जास्त आहे.

५० टक्के केंद्रांवर वेबकास्टिंग

जिल्ह्यात ३ हजार ४५२ मतदान केंद्रे असून, त्यापैकी महापालिका क्षेत्रातील सर्व व ग्रामीणमधील ५० टक्के अशारितीने २ हजार ९० मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग होणार आहे.

जिल्ह्यात १४३ थिमॅटिक मतदान केंद्र

मतदान टक्केवारी वाढीसाठी विविध संकल्पना घेऊन १४३ थिमॅटिक मतदान केंद्र साकारले जाणार आहेत. कुस्तीपंढरी, प्लास्टिक बंदी, लेक वाचवा, रेशीम उद्योग, स्थानिक पर्यटन स्थळे, लोककला, सेंद्रिय शेती अशा विविध विषयांच्या थीमवर आधारित ही केंद्रे असणार आहेत.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00