कोल्हापूर : प्रतिनिधी : गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना चोरट्याकडून घरफोड्याचे सत्र सुरू असून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरली जात आहे. पण चोरट्यांनी आता कांद्याकडे मोर्चा वळवला आहे. कांदा महाग झाल्याने मार्केट यार्डातील एक लाख किंमतीचा ४० पोती कांदा चोरुन नेला आहे. (40 sacks of onions stolen)
कोल्हापूरातील राजर्षी शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सिद्धेश्वर ट्रेडिंग कंपनी येथे कांद्याची चोरी झाली आहे. कांदा बटाटा व्यावसायिक रामचंद्र बाबूराव कात्रट यांचे गोडाऊन १२ सप्टेंबरपासून १५ सप्टेंबरपर्यंत सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद होते. काल मंगळवारी सकाळी नऊ वाजता कात्रट यांनी गोडाऊन उघडले असता लाल कांद्याची ४० पोती चोरल्याचे दिसून आले. या कांद्याची किंमत अंदाजे एक लाख रुपये आहे. तसेच गोडाऊन लावले सीसीटीव्ही फुटेजचे डीव्हीआयआर व्हिजन कंपनीचे १२ हजार किंमतीचे मशिनही चोरट्यांनी पसार केले. तसेच रोख पाच हजार रुपयेही पळवून नेले. कात्रट यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिस गुन्ह्याचा तपास करत आहेत. (40 sacks of onions stolen)
कांदा महाग झाल्याने चोरट्यांनी कांदा चोरला आहे. सध्या मार्केट यार्डमध्ये कांद्याचा दर प्रतिकिलो ४० रुपयांपासून ७० रुपये असा दर आहे. तर किरकोळ बाजारात कांद्याचा दर प्रतिकिलो ६० रुपयांपयासून १०० रुपयांपर्यंत विकला जात आहे. कांद्याचे दर गगनाला भिडल्याने चोरट्यांनी कांद्याची पोती चोरुन नेली. बाजार समितीत सुरक्षा रक्षक असूनही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (40 sacks of onions stolen)