पुणे : प्रतिनिधी : मुंबई लोहमार्ग पोलिस दलात नुकत्याच बदली होऊन आलेल्या पोलिस निरीक्षक वैशाली तोटेवार आणि एका पंटरला लाचलुचलत प्रतिबंधक विभागाने २८ लाख रुपयांची लाच घेताना जाळ्यात पकडले. पुण्यातील बंडगार्डन परिसरात ही कारवाई केली. या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. (Female Police Officer Caught Red-Handed While Accepting a Bribe of ₹28 Lakhs)
सहाय्यक पोलिस निरीक्षक वैशाली तोटेवार या पुणे जिल्ह्यातील आर्थिक गुन्हे शाखेत सहाय्यक निरीक्षक पदावर कार्यरत होत्या. नुकतीच त्यांची मुंबई पोलिस दलात पोलिस निरीक्षक म्हणून बदली झाली आहे. एक मे रोजी त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. पुणे पोलिस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना त्यांच्याकडे आठ ते नऊ तक्रार अर्जाच्या चौकशीचे काम सोपवले होते. त्यातील एका तक्रार अर्जाच्या चौकशीसाठी तोटेवार यांनी तक्रारदाराकडे ३० लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने सुरवातीला दोन लाख रुपये दिले होते. उर्वरीत २८ लाखाच्या लाचेसाठी त्यांनी तक्रारदाराकडे तगादा लावला होता. . (Female Police Officer Caught Red-Handed While Accepting a Bribe of ₹28 Lakhs)
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्राराची पडताळणी करुन पोलिसांनी शनिवारी बंडगार्डन रस्त्यांवर एका तारांकित हॉटेलसमोर सापळा रचला. तोटेवार यांनी एका पंटरला लाचेची रक्कम स्वीकारण्यास पाठवले. पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. वैशाली तोटेवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. (Female Police Officer Caught Red-Handed While Accepting a Bribe of ₹28 Lakhs)