Home » Blog » संजय राऊतांचा वाचला कणकवलीतील खुनांचा पाढा

संजय राऊतांचा वाचला कणकवलीतील खुनांचा पाढा

by प्रतिनिधी
0 comments
MP Sanjay Raut criticizes Nitesh Rane

मुंबई : प्रतिनिधी : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मंत्री नितेश राणे यांनी आमदार अदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. त्यावर राणे यांच्याविरोधात खासदार संजय राऊत यांनी मोर्चा उघडला आहे. त्यांनी कोकणातील दहशतीचा मुद्दा काढताना कणकवलीत गोवेकर, अंकुश राणे, भिसे, नाईक यांचे खून कुणी केले? असा सवाल करत कणकवलीतील खुनांचा पाढाच वाचला. (MP Sanjay Raut criticizes Nitesh Rane)

अदित्य ठाकरेंचा खुलासा

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा  पुन्हा नव्याने तपास करण्याचा आदेश न्यायालयाने सीबीआयला दिला आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी फिर्याद दिली असून त्यामध्ये अदित्य ठाकरे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पोलिस अधिकारी, अभिनेत्यांवर संशय व्यक्त केला आहे.  ठाकरे घराण्यातीत थेट अदित्य ठाकरे यांचे नाव आल्याने खळबळ उडाली आहे. आमदार अदित्य ठाकरे यांनी आपली आणि दिशाची ओळखच नव्हते असा खुलासा केला आहे. मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती. केवळ राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून माझा संबंध जोडण्याचा प्रयत्न केल जात आहे. पण त्यांनी कितीही ही बोंबा मारल्या तरी काही फरक पडणार नाही, अन्यायाविरोधात माझा लढा चालूच राहील, अशी स्पष्ट भूमिका ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी मांडली.  तर उद्धव ठाकरे यांनी राजकीय हेतून प्रेरित होऊन ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी षढयंत्र रचल्याचा आरोप केला आहे. (MP Sanjay Raut criticizes Nitesh Rane)

गोवेकर, अंकुश राणे, भिसे, नाईक अशी किती नावे घ्यायची?

भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी दिशाच्या वडिलांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर अदित्य ठाकरे यांना अटक करुन चौकशी करावी लागेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी वीस वर्षातील खुनाचा पाढा वाचला. गोवेकर, अंकुश राणे, भिसे, नाईक अशी किती नावे घ्यायची? असा सवाल केला आहे. या सर्व प्रकरणांचा तपास निष्पक्षपणे झाला असता तर आज हे लोक बोलायला उरले नसते अशी टीका केली. तसेच यांच्या अंगावर, हातावर आणि जिभेवर रक्त लागले आहे. त्यामुळे त्यांना खून पचवण्यासाठी सत्तेची गरज लागते अशी टीका केली. (MP Sanjay Raut criticizes Nitesh Rane)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!