बेळगाव : प्रतिनिधी : थंडीपासून बचाव करण्यासाठी झोपताना खोलीत पेटवलेल्या शेकोटीच्या धुराने तिघांचा गुदमरुन मृत्यू झाला. बेळगाव शहरातील अमन नगरमध्ये ही घटना घडली. एकाची प्रकृती अत्यवस्थ आहे.
बेळगावातील अमन नगरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. सध्या बेळगावात कडाक्याची थंडी पडली आहे. कडक्याच्या थंडीमुळे झोपताना या तरुणांनी शेकोटी घरात केली होती. शेकोटीच्या धुरामुळे या तरुणांचा झोपेत गुदमरून मृत्यू झाला. चार मित्र एकाच खोलीत राहत होते. रिहान मट्टे (२२), मोईन नालबंद (२३) आणि सर्फराज हरपनहळी (२२) अशी गुदमरून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. अत्यवस्थ तरुणाचे नाव शहानवाज ( १९) असे आहे. (Belgaum Aman Nagar)
थंडीपासून बचाव करण्यासाठी या तरुणांनी कोळशाची शेगडी पेटवली होती. खोलीच्या खिडक्या आणि दरवाजे बंद होते. त्यामुळे धूर खोलीत कोंडून राहिला आणि तिघांचा गुदमरून मृत्यू झाला.एक जण अत्यवस्थ असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचे वृत्त कळताच पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.माळ मारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.घटनेचे वृत्त कळल्यावर अमन नगर येथील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. (Belgaum Aman Nagar)




