Home » Blog » जगातील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रध्वज प्रदर्शित

जगातील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रध्वज प्रदर्शित

by प्रतिनिधी
0 comments
World's second largest national flag displayed

बेळगाव : प्रतिनिधी : जगात आकाराने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या खादी  राष्ट्रध्वज बेळगावातील सुवर्ण सौध या विधिमंडळाच्या इमारतीच्या समोर प्रदर्शित करण्यात आला. हा राष्ट्रध्वज आकाराने ७५ फूट बाय  ५५ फूट इतका आहे. (World’s second largest national flag displayed, Belgaum)

                    कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चरखा चालवून या भव्य  राष्ट्रध्वजाचे अनावरण केले. गुलबर्गा येथील कुमार रेवाप्पा बंमणा आणि त्यांच्या कुटुंबियांनी हा राष्ट्रध्वज तयार केला आहे. बेळगावात महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस अधिवेशनाला मागच्या वर्षी शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने महात्मा गांधींचा पुतळा सुवर्ण सौध येथे बसविण्यात आला आहे. (World’s second largest national flag displayed, Belgaum)

                  काँग्रेसतर्फे गांधी भारत अभियान सुरु असून त्याचाच एक भाग म्हणून हा  भव्य राष्ट्रध्वज प्रदर्शित करण्यात आला आहे. राष्ट्रध्वज प्रदर्शित केल्यावर राष्ट्रगीत झाले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला उप मुख्यमंत्री के. सिद्धरामय्या, मंत्री, आमदार, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. (World’s second largest national flag displayed, Belgaum)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00