Home » Blog » कर्नाटकच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पुत्राच्या कार चालकावर चाकू हल्ला

कर्नाटकच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पुत्राच्या कार चालकावर चाकू हल्ला

by प्रतिनिधी
0 comments
Knife attack on car drivers. Belgaum

बेळगाव : प्रतिनिधी : कर्नाटकच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पुत्राच्या कार चालकावर अज्ञातानी चाकू हल्ला केल्याची घटना बेळगावातील क्लब रोडवर घडली. कार चालक बसवंत कडोलकर (३२) याच्यावर अज्ञातानी चाकू हल्ला केला आणि ते घटना स्थळावरून  लगेच पसार झाले. (Knife attack on car drivers)

                       चाकू हल्ला झालेल्या बसवंत याला उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. सध्या बसवंत याची स्थिती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.पैशाच्या व्यवहारातून चाकू हल्ला झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ओळखीच्या व्यक्तींनीच चाकू हल्ला केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Knife attack on car drivers)

                      मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा पुत्र  अन युवा काँग्रेस नेता मृणाल हेब्बाळकर यांचा बसवंत हा कारचालक आहे. चाकू हल्ल्याचे वृत्त कळताच मृणाल हेब्बाळकर यांनी हॉस्पिटलमध्ये जावून कार चालकाच्या प्रकृतीची चौकशी केली. घटनेचे वृत्त कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यास प्रारंभ केला. हल्ला झालेल्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज पोलीस तपासत असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. कॅम्प पोलीस स्थानकात सदर घटनेची नोंद झाली आहे. (Knife attack on car drivers)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00