Home » Blog » Kudchi  : विद्यार्थ्यांचे ऊसाच्या शेतात आंदोलन

Kudchi  : विद्यार्थ्यांचे ऊसाच्या शेतात आंदोलन

by प्रतिनिधी
0 comments
Kudchi

बेळगाव : प्रतिनिधी :   शाळेला जाण्याचा रस्ता बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांनी चक्क ऊसाच्या शेतात आंदोलन करून प्रशासनाचे आणि सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. बेळगाव जिल्हयातील चिकोडी तालुक्यातील कुडची येथे शाळेचा रस्ता सुरु करण्यासाठी आणि गूळ पावडर तयार करण्याचा कारखाना बंद करण्यासाठी  विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन चर्चेचा विषय ठरले. शाळेच्या व्यवस्थापनाने या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली आहे. (Kudchi)

२०११ पासून कुडची येथे रॉयल इंडियन अकादमी नावाने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु आहे. सरकारने दहावी पर्यंत वर्ग घेण्यास शाळेला परवानगी दिली आहे. या शाळेत सहाशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेच्या बाजूलाच एका माजी आमदाराने गुळाची पावडर तयार करण्याचा कारखाना सुरु केला आहे.वीस नोव्हेंबर पासून हा कारखाना सुरु झाला आहे. या कारखान्यामुळे शाळेत दुर्गंधी येत असून धूळ उडून येत आहे. याशिवाय पाणी देखील दूषित होत आहे. विद्यार्थ्यांना वर्गात मास्क लावून बसण्याची वेळ आली आहे. (Kudchi)

                         कारखान्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याची तक्रार केल्यावर शाळेच्या प्रशासक महिला अधिकारी आणि अन्य एकाला मारहाण करण्यात आली. त्यानंतर शाळेला जाणारा रस्ता बंद करण्याची मुजोरी माजी आमदाराने केली. आणखी एका दुसऱ्या रस्त्यावर काटे पसरून रस्ता बंद केला. त्यामुळे विद्यार्थी, पालकांनी कारखाना बंद करा आणि रस्ता सुरु करा या मागणीसाठी ऊसाच्या शेतात धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त केला. घटनास्थळी तहसीलदार, पोलीस दाखल झाले आणि त्यांनी शाळेची बाजू समजून घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. (Kudchi)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00