Home » Blog » Hiremalangi : आईने केली दोन दिवसाच्या अर्भकाची हत्या

Hiremalangi : आईने केली दोन दिवसाच्या अर्भकाची हत्या

by प्रतिनिधी
0 comments
Hiremalangi

बेळगाव : प्रतिनिधी :  दोन दिवसाच्या नवजात अर्भकाची जन्मदात्या मातेनेच गळा दाबून हत्या केल्याची संतापजनक आणि हृदयद्रावक घटना रामदुर्ग तालुक्यातील हिरेमलंगी गावात घडली. अगोदर तीन मुली असताना चौथीही मुलगी झाल्याने मातेनेच आपल्या नवजात बाळाचा गळा घोटला. अश्विनी हलकट्टी (वय २८) असे या निर्दयी मातेचे नाव आहे.तिला पहिल्या तीन मुली आहेत. चौथीही मुलगीच झाल्यामुळे संतापलेल्या अश्विनीने दोन दिवसाच्या नवजात अर्भकाची गळा दाबून हत्या केली. (Hiremalangi)

२३ नोव्हेंबर रोजी अश्विनी हिची मुदकवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती झाली होती. प्रसूती नंतर अश्विनी दुसऱ्या दिवशी आपल्या माहेरी आईच्या घरी हिरेमलंगी येथे गेली.मंगळवारी घरात कोणी नसताना तिने नवजात अर्भकाचा गळा दाबून जीव घेतला. नंतर तिने नाटक करून बाळ श्वास घेत नसल्याचे नसल्याचे नाटक करून रामदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळाला घेऊन गेली. तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यावर नवजात बाळाची गळा दाबून हत्या केल्याचे लक्षात आले. ही घटना नंतर पोलिसांना कळवल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हिरेमलंगी गावात जावून माहिती घेतली.अश्विनीवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. सुरेबान पोलीस स्थानकात या गुन्ह्याची नोंद झाली आहे अशी माहिती बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी माध्यमाशी बोलताना दिली. (Hiremalangi)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00