Home » Blog » साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन तीन कामगार ठार

साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन तीन कामगार ठार

by प्रतिनिधी
0 comments
Three workers killed in a boiler explosion

बेळगाव :  प्रतिनिधी :  इनामदार शुगर्स लिमिटेड या साखर कारखान्यात बॉयलरचा स्फ़ोट होऊन तीन कामगार जागीच ठार झाले तर सहा जण गंभीर भाजल्याने त्यांची स्थिती चिंताजनक आहे. बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील मरकुंबी गावातील साखर कारखान्यात ही दुर्दैवी घटना घडली. (Three workers killed in a boiler explosion)

                    साखर कारखान्यात सध्या गळीत हंगाम सुरु आहे. नेहमी प्रमाणे गळीताचे काम सुरु असताना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बॉयलरचा स्फ़ोट झाला आणि गरम पदार्थ अंगावर पडल्याने तीन कामगारांचा जागीच होरपळून मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले. (Three workers killed in a boiler explosion)

                   जखमीपैकी एकाला बैलहोंगल येथील सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. अन्य जखमीना झिरो ट्रॅफिक व्यवस्था करून तातडीने बेळगावच्या के एल ई  इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. घटनेचे वृत्त कळताच पोलीस आणि कामगार खात्याच्या अधिकाऱ्यांनी साखर कारखान्याला भेट दिली. बेळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन यांनी के एल इ इस्पितळाला भेट देऊन महिती घेतली.या घटनेची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झाली आहे. (Three workers killed in a boiler explosion)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00