नवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी पुन्हा टळली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत पुढील वर्षी जानेवारी महिन्यात तारीख दिली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत शिवसेनेचे धनुष्यबाण आणि राष्ट्रवादीचे घड्याळ या चिन्हासंदर्भात निर्णय होणार नसल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मशाल तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला तुतारी चिन्हावर लढावे लागणार आहे. (Next date for hearing of disqualification)
शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी आठ ऑक्टोबरला होणार होती. मात्र न्यायाधीश सूर्यकांत यांनी आजची १२ नोव्हेंबर तारीख दिली होती. त्यांच्या बेंचसमोर आज शिवसेना आणि राष्ट्रवादीची एकत्रित सुनावणी १९ क्रमांकावर लागली होती. मात्र सूर्यकांत यांनी पुढची तारीख दिली आहे. ही सुनावणी पुढील वर्षी २१ जानेवारी २०२६ ला होणार आहे. (Next date for hearing of disqualification)
आजच्या सुनावणीवर बोलताना शिवसेनेचे खासदार अनिल देसाईयांनी नाराजी व्यक्त केली. आमदार अपात्रतेच् प्रकरण अत्यंत गंभीर असून न्यायालयाने यावर लवकरात लवकर सुनावणी घ्यायला हवी होती. युक्तीवादासाठी आम्हाला दोन तास लागतील असे आम्ही न्यायालयाला सांगितले होते. परंतु न्यायाधीश सूर्यकांत यांनी २१ जानेवारीची तारीख दिली आहे. ती आम्हाला अजिबात अपेक्षित नव्हती, असे म्हणत खासदार देसाई यांनी संताप व्यक्त केला. (Next date for hearing of disqualification)