नागपूर : प्रतिनिधी : “लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारचा फायदा झाला. महायुती सत्तेत परत आली. पण आमचा एक नंबरचा माणूस दोन नंबरला जाऊन बसला. हा महाराष्ट्राचा तोटा झाला आहे, असा चिमटा राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी काढला. यावर मंत्री शंभूराजे देसाई यांनी दोन नंबरवरील माणून पुन्हा एक नंबरवर येऊ शकतो असे प्रत्युत्तर जयंत पाटलांना दिले. (Jayant Patil took out Eknath Shinde’s tweezers)
विधानसभेत लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणी आणि ई-केवायसीवर चर्चा सुरू होती. त्या चर्चेत भाग घेताना आमदार जयंत पाटील यांनी टोला मारण्याची संधी सोडली नाही. जयंत पाटील म्हणाले, आमचा लाडकी बहीण योजनेला पूर्ण पाठिंबा आहे. आमचा एकनाथ शिंदेंना देखील पाठिंबा आहे. या योजनेमुळे राज्य सरकारचा फायदा झाला आहे. महायुती सत्तेत परत आली. परंतु आमचा एक नंबरचा माणूस दोन नंबरला जाऊन बसला. हा महाराष्ट्राचा मोठातोटा आहे. सरकारची स्थिती काही असली तरी एक नंबर हा एक नंबरच असतो. या एक नंबर आणि दोन नंबरमुळे एकनाथ शिंदेंचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार पाटील यांनी लाडक्या बहिणींची ई केवायसी प्रक्रिया व्यवस्थित झाली नाही. या पदावर असलेल्या मंत्री महोदयांना जबाबदार धरले पाहिजे असे म्हणत मंत्री अदित्य तटकरे यांना जबाबदार धरले. (Jayant Patil took out Eknath Shinde’s tweezers)
जयंत पाटील यांच्या चिमट्यावर शंभूराज देसाई म्हणाले, एकनाथ शिंदे हे कायम दोन नंबरवर राहतील असे काही नाही. पदांची अदलाबदल होत असते. मी काही वेगळे बोललो नाही. मुख्यमंत्री स्वत:च म्हणाले होते की आम्ही आमच्या आमच्यात पद बदलत असतो. त्यावरुन मी तसं म्हटलं, असा खुलासा केला. (Jayant Patil took out Eknath Shinde’s tweezers)