Home » Blog » अमेरिका, इराणकडून हल्ल्यांचा जोर कायम; होर्मुझ सामुद्रधुनी बंद

अमेरिका, इराणकडून हल्ल्यांचा जोर कायम; होर्मुझ सामुद्रधुनी बंद

by प्रतिनिधी
0 comments
Strait of Hormuz closed

नवी दिल्ली : तीन महिन्यांच्या युद्धविरामानंतर अमेरिका आणि इराणने पुन्हा एकदा हल्ले, प्रतिहल्ले सुरू केल्याने मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाला सुरूवात झाली आहे. दोन्ही देशांनी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले सुरू ठेवले. युद्धजन्य स्थितीमुळे इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका जगभरातील तेलवाहतुकीला बसल्याने इंधनाचे दर आणखीन भडकण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेने तब्बल ४१ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती पुढे आली आहे. इराण पायाभूत सुविधांवर हल्ले केले आहे. अमेरिकेने पिण्याच्या पाणी प्रकल्पावर हल्ला केल्याची माहिती पुढे आली आहे. इराणने १९ क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती पुढे आली आहे. बहरीन, कुवेत आणि जॉर्डनमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. इराणने जशास तसे प्रत्युत्तर देण्याची शपथ घेतली आहे. तर इराणने शांतता करारास विलंब केल्यास त्यांना त्यांची किंमत मोजावी लागेल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. (Strait of Hormuz closed)

होर्मुझमधून जहाज वाहतूक बंद

वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनी वाहतूक बंद केली असल्याची घोषणा केली. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलवाहू जहाजे आणि व्यापारी जहाजांसह सर्व जहाजांसाठी बंद करण्यात आला आहे असे जाहीर कले आहे. सामुद्रधुनीतून जाण्याच्या प्रयत्न करणाऱ्या जहाजांना लक्ष्य करण्यात येईल असा इशारा दिला आहे. होर्मुझची सामुद्रधुनीतून जागतिक तेल आणि नैसर्गिक वायूच्या वाहतुकीपैकी अंदाजे एक पंचमाश वाहतूक होते. (Strait of Hormuz closed)

अमेरिकन अधिकाऱ्यांनी होर्मुझ बंद करण्यासंदर्भात इराणचा दावा फेटाळला आहे. या जलमार्गातून व्यापारी जहाजांची वाहतूक सुरू आहे. अनेक जहाजांनी इराणच्या परवानगीशिवाय होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडल्याचा दावा केला आहे.

अमेरिकेचा पाणीपुरवठा सुविधांवर हल्ला

अमेरिकेने नागरी पाणीपुरवठा सुविधांवर हल्ला केल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सांगितले की होर्मोझगान प्रांतातील दहा गावातील २० हजार रहिवाशांना पिण्याचे पाणी पुरवणारे दोन जलाशय नष्ट करण्यात आला आहे. हा हल्ला मानवधिकाऱ्यांचे घोर उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.(Strait of Hormuz closed)

You may also like

error: Content is protected !!