Home » Blog » अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

by प्रतिनिधी
0 comments
Farmer injured in bear attack

बेळगाव : प्रतिनिधी : पाळीव जनावरांना चरायला जंगलात घेऊन गेलेल्या तरुण शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.  बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हुळंद गावातील जंगलात ही घटना घडली. झाडावर चढून शेतकऱ्याने आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला होता. (Farmer injured in bear attack)

                         हुळंद गावातील शेतकरी महेश गावडे (वय २५) हे नेहमीप्रमाणे जंगलात जनावरांना चरण्यास घेऊन गेले होते. जंगलात जनावरे चरत असताना अचानक महेश समोर अस्वल आले. प्रसंगावधान राखून महेशने बाजूच्या झाडावर चढून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पण अस्वल देखील त्याच्या बरोबर झाडावर चढले आणि त्याचा चावा घेतला. अस्वलाने पायावर हल्ला केल्याने पायाला गंभीर जखम होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. यावेळी जंगलातून जाणाऱ्या अन्य शेतकऱ्यांनी जखमी अवस्थेत पडलेल्या महेश यांना पाहिले. त्यांनी विचारपूर करुन संबधित घटनेची माहिती  वन खात्याला कळवली. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर झाल्याने महेश याची अवस्था गंभीर आहे. त्याच्यावर बेळगाव मधील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. (Farmer injured in bear attack)

You may also like

error: Content is protected !!