Home » Blog » एसटी बसचा प्रवास्यांना दरवाढीचा शॉक!

एसटी बसचा प्रवास्यांना दरवाढीचा शॉक!

by प्रतिनिधी
0 comments
ST Bus Passengers Hit by Fare Hike Shock

जमीर काझी : मुंबई : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असतानाच आता त्यांना आणखी एक दणका बसणार आहे. ऐन सुट्टीचा हंगामात राज्य परिवहन महामंडळाने ( एस. टी ) बसच्या प्रवाशी भाड्याच्या दरात १० टक्के वाढ केली आहे. १५ एप्रिलपासून त्यांच्या खिशाला भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. (ST Bus Passengers Hit by Fare Hike Shock)

 राज्य परिवहन महामंडळाने  बसच्या भाड्यात हंगमी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवासी भाड्यात १० टक्क्यांनी वाढ केली असून  १५ एप्रिलपासून प्रवाशांकडून सुधारीत दराने तिकीट आकारण्यात येणार आहे.  ‘महिलांसाठी अर्धे तिकीट करता आणि इकडे प्रवास भाडे वाढवता, त्यापेक्षा एसटीच बंद करू टाका. श्रीमंत लोक एसटीने प्रवास करत नाहीत, भाव वाढ ही गरिबांच्या खिशाला कात्री आहे. तिकटाची दरवाढ कमी करून गरिबांना दिलासा दिला पाहिजे. ‘ अशा प्रतिक्रिया प्रवाशांमधून उमटत आहेत. (ST Bus Passengers Hit by Fare Hike Shock)

   मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे अनेक जण उन्हाळ्यात प्रवासाचा बेत आखत असतात. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये एसटी बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. मात्र ऐन याच काळात आता एसटी महामंडळाकडून हंगामी भाडेवाढ करण्यात आली आहे. त्याचा मोठा फटका हा आता प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. प्रवाशांना भाडेवाढीमुळे मोठी आर्थिक झळ बसणार आहे. (ST Bus Passengers Hit by Fare Hike Shock)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00