Home » Blog » काँग्रेसची ओबीसी बहुजन पक्षासोबत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आघाडी

काँग्रेसची ओबीसी बहुजन पक्षासोबत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आघाडी

by प्रतिनिधी
0 comments
Congress forms an alliance with the OBC Bahujan Party

मुंबई : प्रतिनिधी : काँग्रेसची ओबीसी बहुजन पक्षासोबत आघाडी झाली असून आगामी जिल्हा परिषद निवडणुका एकत्रित लढणार आहोत, अशी  घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

ओबीसी बहुजन पक्षाचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी त्यांचे सहकारी चंद्रकांत बावकर, जे. टी. तांडेल, पांडुरंग मिरगळ यांनी टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसोबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  सपकाळ यांनी आघाडीची घोषणा केली, ते  म्हणाले की, आमची आघाडी निवडणुकीसाठी नाही तर  सामाजिक न्यायासाठी झाली आहे. राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची आग्रही मागणी केल्यानंतर मोदी सरकारला त्याचा निर्णय घ्यावा लागला पण अजून ही जातनिहाय जनगणना झालेली नाही. ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढी भागिदारी ही काँग्रेसची भूमिका आहे. राहुल गांधी यांच्या या भूमिकेला सर्व समाजातून पाठिंबा मिळत आहे. धनगर, ओबीसी समाजाचे योग्य प्रतिनिधित्व असावे यावर भर दिला जाईल. (Congress forms an alliance with the OBC Bahujan Party)

भाजपाची सत्ता आल्यावर पहिली सही धनगर समाजाच्या आरक्षणाची करेन असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये २०१४ साली दिले होते पण आजपर्यंत त्याची पूर्तता केलेली नाही. फडणवीस यांनी धनगर, ओबीसी, मराठा, आदिवासी समाजाची आरक्षणाच्या नावाखाली फसवणूक केली आहे. जाती जातीत भांडणे लावण्याचे काम त्यांनी केले आहे. या समाजाचा भाजपा व फडणवीस यांच्यावरचा विश्वास उडाला आहे, असे  सपकाळ म्हणाले.

यावेळी प्रकाश शेंडगे म्हणाले की, ओबीसी आरक्षणाचे लचके तोडण्याचे काम केले जात असून २७ टक्के आरक्षणावरही घाला घातला जात आहे. जीआर वर जीआर काढले जात आहेत पण कोणत्याच समाजाला त्याचा फायदा होत नाही. ओबीसी समाजाला न्याय मिळविण्यासाठी स्वतंत्र पक्षाची स्थापना करुन समविचारी पक्षाशी आघाडी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जातनिहाय जनगणनेची भूमिका घेतल्याबद्दल राहुल गांधी यांचे आम्ही आभार मानतो. त्यांच्या नेतृत्वाखालीच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केला. (Congress forms an alliance with the OBC Bahujan Party)

भिवंडीतील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार.. भिवंडी महानगरपालिकेत विजयी झालेल्या काँग्रेसच्या ३० नगरसेवकाचा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते  सत्कार  करण्यात आला. यावेळी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील, भिवंडी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आ. रशीद ताहीर मोमीन, प्रभारी राजेश शर्मा, प्रदेश सरचिटणीस नूर अन्सारी, जावेद फारुखी, रमाकांत भोई यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Congress forms an alliance with the OBC Bahujan Party)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00