Home » Blog » rahul take jab on modi : नाव घेतले तर ट्रम्प मोदींना उघडे पाडतील : राहुल गांधी

rahul take jab on modi : नाव घेतले तर ट्रम्प मोदींना उघडे पाडतील : राहुल गांधी

by प्रतिनिधी
0 comments
rahul take jab on modi

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी करण्यात  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट म्हणू शकत नाहीत. ते त्यांचे नाव घेऊ शकत नाही. कारण त्यांनी नाव घेतले तर ट्रम्प मोदी यांना उघडे पाडतील, सत्य उघड करतील, अशी टीका काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी बुधवारी (३० जुलै) केली. (rahul take jab on modi)

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वद्रा यांनीही, अमेरिकेचे अध्यक्ष खोटे बोलत आहेत असे पंतप्रधान मोदींनी संसदेत स्पष्टपणे सांगावे, असे आव्हान दिले.

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी आणण्यात भूमिका बजावल्याचा दावा सातत्याने ट्रम्प करत आहेत. या पार्श्वभूमीवर दोघांनी मोदींना आव्हान दिले.

ट्रम्प यांनी त्यांच्या दाव्यांची पुनरावृत्ती केली. तसेच भारत अमेरिकेच्या २० ते २५% पर्यंत वाढीव कर आकारणीला तोंड देण्याची तयारी करत आहे, असे ताजे विधान केले आहे. या विधानाबद्दल विचारले असता, गांधी म्हणाले, ‘‘हे स्पष्ट आहे की, पंतप्रधानांनी ट्रम्प खोटे बोलत आहेत असे म्हटलेले नाही. जे घडले ते स्पष्ट आहे. सर्वांना माहिती आहे, पण तसे ते म्हणू शकत नाहीत. हेच वास्तव आहे.’’ (rahul take jab on modi)

‘‘पंतप्रधान असे बोलत असतील तर ते (ट्रम्प) उघडपणे बोलतील आणि सत्य उघड करतील, म्हणूनच पंतप्रधान काहीही बोलू शकत नाहीत,’’ असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.

ते म्हणाले की, ट्रम्प व्यापार करारासाठी भारत सरकारवर दबाव आणण्यासाठी हे विधान करत आहेत.

‘‘आता, तुम्ही पाहताच कोणत्या प्रकारचा व्यापार करार होतो,’’ असे त्यांनी संसद भवन संकुलात पत्रकारांना सांगितले. (rahul take jab on modi)

प्रियंका गांधी म्हणाल्या, ‘‘तुम्ही पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यांनी वापरलेले शब्द काळजीपूर्वक ऐकले तर ते अस्पष्ट आहेत, हे दिसते. त्यांनी थेट बोलावे. राहुलजी यांनी काल देखील म्हटले होते की, त्यांनी (मोदी) अमेरिकेचे अध्यक्ष खोटे बोलत आहेत असे म्हणावे. त्यांनी ते संसदेत बोलावे.’’ (rahul take jab on modi)

तत्पूर्वी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही असेच म्हटले होते. म्हणाले की, ट्रम्प खोटे बोलत आहेत हे सांगण्याची पंतप्रधानांमध्ये हिंमत नाही.

‘‘आमचे धोरण असे राहिले आहे की आम्ही वाटाघाटींमध्ये कधीही तृतीय पक्षाच्या मध्यस्थीचा स्वीकार केलेला नाही आणि आजही आम्हाला ते अस्वीकार्य आहे. त्यांनी का मान्य केले? त्याची कारणे काय होती? त्यांनी देशाला सांगावे,’’ असे खरगे यांनी संसद भवन संकुलात पत्रकारांना सांगितले.

‘‘मोदींनी त्यांच्या दोन तासांच्या भाषणात एकदाही ट्रम्प यांचे नाव घेतले नाही. त्यांनी ट्रम्प यांच्या वक्तव्याचा निषेध करायला हवा होता आणि ट्रम्प देशाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत असे म्हणायला हवे होते,’’ असे खरगे म्हणाले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00