मुंबई : प्रतिनिधी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सप्टेंबर महिन्याचा हप्ता आज शुक्रवार (दि.१०) पासून जमा होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार आहे. पण ऑक्टोंबर महिन्याचा हप्त्यासाठी ई- केवायसीची अट घातली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील महिलांना ई केवायसी अनिवार्य असणार आहे. (September installment payment)
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी माहिलांसाठी ई- केवायसीची अनिवार्य केली आहे. पण ई केवायसी करण्यासाठी तांत्रिक अडचणी येत असल्याने सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी केवायसीची अट शिथील केली आहे. तांत्रिक अडचण असली तरी अनेक भगिणींच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे. सप्टेंबरचा हप्ता जमा झाला असला तरी या योजनेतील महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया तातडीने करुन घ्यावी, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे. ज्या महिला ई-केवायसी करणार नाही, त्यांना ऑक्टोबरचा हप्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. (September installment payment)
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर एक्स पोस्ट केली आहे. त्यात असे म्हटले आहे की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून (१० ऑक्टोबर) सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील दोन महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती,” (September installment payment)