नवी दिल्ली : पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर गुरुवारी मध्यरात्री एअरस्टाईक केला आहे. या हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू झाला असून तहरिक-ए-तालिबान या संघटनेचा प्रमुख नूर वली महसुद ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पण त्यांच्या मृत्यूची अद्याप पुष्टी झालेली नाही. (Noor Wali Mehsud)
नूर वलीला संपवण्यासाठी पाकिस्तानने एअर स्ट्राईक केला असल्याचे वृत्त एका वृत्त वाहिणींने दिले आहे. त्यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत तालिबान सरकारची काय प्रतिक्रिया येणार याकडे लक्ष लागले आहे. अफगाणिस्तानमध्ये घुसण्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असा इशारा यापूर्वी तालिबानने पाकिस्तानला दिला आहे. अमेरिकेच्या पाठिंब्यावर पाकिस्तानने एअर स्ट्राईक केल्याचा दावा केला आहे. (Noor Wali Mehsud)
मुल्ला फजलुल्लाहच्या हत्येनंतर नुर वली महसुदने २०१८ मध्ये तहरिक-ए-तालिबान सुत्रे स्वीकारली. त्यावेळी अफगाणिस्तानवर अमेरिकेचे नियंत्रण होते. टीटीपीने तालिबानसोबत मिळून अमेरिकेला हादरे दिले होते. अखेर अमेरिकेला अफगाणिस्तानातून गाशा गुंडाळावा लागला होता. त्यानंतर तहरिक-ए-तालिबानने पाकिस्तानला त्रास देण्यास सुरुवात केली. टीटीपीने वर्षभरात पाकिस्तानवर ७०० हून अधिक हल्ले केले आहे. त्यामध्ये २७० पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. (Noor Wali Mehsud)
टीटीपी प्रमुख नूर वलीने नोबेल पुरस्कार विजेत्या मलाला युसुफजईचा हत्येचा आदेश दिला होता. त्यानंतर मलालावर जीवघेणा हल्ला झाला होता. बेनजीर भुत्तो यांच्या हत्येमध्ये तालिबानचा हात होता या संबधीत नूर वलीने अनेक खुलासे केले आहेत. त्यामुळे तो अमेरिका आणि पाकिस्तानच्या टारगेटवर होता. अमेरिकेच्या पाठिंब्यावर पाकिस्तानने काबूलवर एअरस्ट्राईक केला. अफगाणिस्तानच्या राजधानीत थेट हल्ला केल्याने तालिबान सरकार कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. (Noor Wali Mehsud)