Home » Blog » भोंदूबाबा अशोक खरातशी संबंधित सर्वांचे सीडीआर तपासा;  विरोधकांची मागणी 

भोंदूबाबा अशोक खरातशी संबंधित सर्वांचे सीडीआर तपासा;  विरोधकांची मागणी 

by प्रतिनिधी
0 comments
Examine the CDRs of everyone associated with Kharat

जमीर काझी : मुंबई : लिंगपिसाट  भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून सोमवारी महाराष्ट्र विधानसभेत जोरदार चर्चा रंगली.  विधानसभेतील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी  प्रकरणातील सर्व संबंधित व्यक्ती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मोबाईल कॉल रेकॉर्डची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मंगळवारी सभागृहात सविस्तर निवेदन करणार असल्याचे जाहीर केले.

राज्यभरात चर्चेचा विषय बनलेल्या भोंदू बाबा अशोक खरात यांच्या सेक्स स्कॅडल आणि  त्याच्यामध्ये गुंतलेले राजकारणी व वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. आज सभागृहात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र  अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तो नाकारला मात्र त्यांनी  वडेट्टीवार यांना  बाजू मांडण्याची संधी दिली. (Examine the CDRs of everyone associated with Kharat)

ते म्हणाले  की, केवळ विशेष तपास पथक (एसआयटी ) नेमणे पुरेसे ठरणार नाही. या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षांसह काही मंत्र्यांची नावेही समोर आली असल्यामुळे  सर्व संबंधितांची भूमिका निष्पक्षपणे तपासली गेली पाहिजे. या प्रकरणात संबंधितांना सहआरोपी करण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी विरोधी पक्षातील इतर सदस्यांनीही सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, ‘पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तातडीने कारवाई केली आहे. तसंच इतर जिल्ह्यात नोंद झालेल्या तक्रारीच्या आधारे आरोपीला परदेशात पळून जाण्यापूर्वीच अटक करण्यात आली. याचबरोबर त्याने  आपल्या कथित ‘अलौकिक शक्तींचा’ गैरवापर करून भोळ्या-भाबड्या महिलांची फसवणूक केल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणावर सरकार उद्या सभागृहात सविस्तर निवेदन देणार असून, चौकशीत जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा  इशाराही फडणवीस दिला.

 दरम्यान या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका पीडित महिलेनं नव्यानं तक्रार दाखल केल्यानंतर, या प्रकरणात अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांना खरातची चौकशी आवश्यक होती. त्यासाठी एसआयटीनं त्याच्या ताब्यासाठी अधिकृत पत्रव्यवहार केला. यानंतर सायंकाळी खरातला एसआयटीकडून गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आलं. रविवारी उशिरापर्यंत गुन्हे शाखेकडून त्याची सखोल चौकशी सुरू होती. तपासादरम्यान पोलिसांनी कठोर भूमिका घेत, कायद्यापुढे कुणीही मोठे नाही, हा स्पष्ट संदेश दिला आहे. (Examine the CDRs of everyone associated with Kharat)

शिंदे, पाटील, केसरकर भेटीवर पवारांची टीका

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि दीपक केसरकर यांच्यासह श्री शिवनिका मंदिराला भेट दिली होती. त्यानंतर अशोक खरातकडे राजकीय नेत्यांची वर्दळ वाढल्याची चर्चा रंगली. राज्यातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भवितव्य जाणून घेण्यासाठी या भेटी घेतल्या जात असल्याचीही कुजबुज होती. या भेटींवर शरद पवार यांनीही सवाल उपस्थित करत, मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीनं असा संदेश देणं अयोग्य असल्याची टीका केली होती. (Examine the CDRs of everyone associated with Kharat)

खरातांच्या मुलीच्या लग्नात तटकरे, केसरकर उपस्थित

भोंदूबाबा अशोक खरातच्या मुलाच्या लग्नातील काही फोटो समोर आले असून, त्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेचे नेते दीपक केसरकर उपस्थित असल्याचं दिसतं. विशेष म्हणजे, तटकरे यांच्या शेजारी स्वतः अशोक खरात बसलेला फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोवरून वाद निर्माण झाल्यानंतर सुनील तटकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं. पण अनेक नेत्यांचे खरातशी लागेबांधे असल्याने मुख्यमंत्र्यांनी याबाबत अजून कठोर कारवाईचे निर्देश द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे. 

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00