Home » Blog » Carrom competition: पश्चिम विभागीय कॅरम स्पर्धा शनिवारपासून

Carrom competition: पश्चिम विभागीय कॅरम स्पर्धा शनिवारपासून

दीडशेवर स्पर्धकांचा सहभाग

by प्रतिनिधी
0 comments
Carrom competition

कोल्हापूर : प्रतिनिधी : येथील प्रकाश कॅरम क्लब, उमा चौक आणि कोल्हापूर जिल्हा कॅरम असोसिएशनचे मान्यतेने पश्चिम विभागीय कॅरम स्पर्धा आयोजित केली आहे. २४ आणि २५ मे रोजी या स्पर्धा होणार आहेत. (Carrom competition)

स्पर्धेसाठी एकूण रोख ४०,०००ची बक्षीसे आहेत. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला रूपये १० हजार, द्वितीय रू. ७ हजार, तृतीय रू. ४ हजार आणि चतुर्थ क्रमांकासाठी रू. ३ हजार अशी बक्षीसे आहेत. तसेच क्रमांक पाच ते आठसाठी प्रत्येकी एक हजार रुपये देण्यात येणार आहेत.

तसेच प्रथम ब्रेक टू फिनिश आणि ब्लँक टू फिनिश करणाऱ्या कॅरमपटूंना सम्राट लकडे आणि गौरव हुदले यांच्यातर्फे रूपये ३००चे बक्षीस देण्यात येणार आहे. (Carrom competition)

मंगळवार पेठेतील सनगर गल्ली तालीम येथे सकाळी दहापासून स्पर्धा होणार आहेत.

स्पर्धेसाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील सुमारे दीडशे कॅरमपटू सहभागी होणार आहेत. १४ कॅरम बोर्ड लावले जाणार आहे. प्रकाश कॅरम क्लब, बच्चू पाटील कॅरम अकॅडमी, सचिन क्लबचे कार्यकर्ते स्पर्धा संयोजन करीत आहेत, अशी माहिती असोसिएशनचे सचिव विजय जाधव यांनी दिली.

हेही वाचा :
 इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा युवा संघ जाहीर

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00