Home » Blog » बांगलादेशी वाढले असल्यास अमित शाह अपयशी,अकार्यक्षम : सचिन सावंत  

बांगलादेशी वाढले असल्यास अमित शाह अपयशी,अकार्यक्षम : सचिन सावंत  

by प्रतिनिधी
0 comments
Sachin Sawant criticizes the BJP

जमीर काझी : मुंबई : देशात बांगलादेशी वाढले असल्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अपयशी आणि अकार्यक्षम आहेत, असे अमित साटम यांना म्हणायचे आहे का? असा सवाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.

भाजपकडून मुसलमान नावाचा जप

भारतीय जनता पक्षाकडे  विकासाच्या मुद्द्यावर चर्चा विकासावर बोलण्यासारखे काहीच नसल्याने ते सातत्याने हिंदू मुस्लीम मुद्दा उकरून काढतात.  भाजपा व अमित साटम यांना झोपेत व स्वप्नातही मुस्लीमच दिसतात. ते प्रभूरामाचा जप करत नाहीत तर मुसलमान नावाचा जप करतात, असा आरोपही सचिन सावंत यांनी केला. (Sachin Sawant criticizes the BJP)

भाजप ‘ढ’ पक्ष

 मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम  यांनी मुंबईत हिंदुंची लोकसंख्या कमी झाली व मुस्लीम लोकसंख्या वाढली असल्याचा आरोप केला. त्याला सावंत म्हणाले की, देशात जनगणना झालेली नाही. मग त्यांनी कुठे आकडेवारी दिली? त्यांनी हा जावई शोध कोठून लावला? मतदार वाढले असे म्हणता तर निवडणूक आयोग आणि भाजप त्यावर स्वतःची पाठ थोपटून घेत होते. भाजपा कसलाही अभ्यास न करता, माहिती न घेता बोलणारा ‘ढ’ पक्ष आहे. व्होट जिहाद म्हणून ते मतदारांचा अपमान करत आहेत. देशात बांगलादेशी वाढले अशी बोंबाबोंब भाजप करते तर मग केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व सक्षम नाही का? ते अकार्यक्षम, कुचकामी आहेत असे अमित साटम यांना म्हणायचे आहे का? तसे नसेल तर अमित शाह यांनी अमित साटम यांची हकालपट्टी करायला हवी, असे सांगितले. (Sachin Sawant criticizes the BJP)

उज्ज्वल निकमांचा पराभव भाजपच्या जिव्हारी

खासदार वर्षा एकनाथ गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांचा दारूण पराभव केला हे भाजपाच्या जिव्हारी लागले आहे. एक बौद्धधर्मीय महिला संसदेत निवडून गेल्या ही मनुवादी भाजपाची खरी पोटदुखी आहे. वर्षानुवर्षे ज्या समाजाला आणि महिलांना नेतृत्व करण्याची संधी मनुवाद्यांनी नाकारली त्यांना संविधानाने नेतृत्व करण्याची संधी दिली हे मनुवाद्यांना खुपते असे सांगून सावंत म्हणाले की, भाजपाला धर्म, जात, भाषा, प्रांत यावरून वाद उभे करून जनतेच्या प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळवायचे आहे. काँग्रेस पक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत जनतेच्या मुलभूत प्रश्नावरच लक्ष केंद्रीत करणार आहे. म्हणूनच विकास हवा आहे विवाद नको या काँग्रेस पक्षाच्या भूमिकेला मुंबईकरांचा पाठिंबा मिळत आहे. भाजपाच्या अपप्रचाराला व धार्मिक मुद्द्यांना जनता भीक घालणार नाही, असेही सांगितले. (Sachin Sawant criticizes the BJP)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00