Home » Blog » Student shot dead: कॅनडातील गोळीबारात भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू

Student shot dead: कॅनडातील गोळीबारात भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू

बस स्टॉपवरून उभी असताना चुकून लागली गोळी

by प्रतिनिधी
0 comments
Student shot dead

हॅमिल्टन : कॅनडातील हॅमिल्टनमध्ये बस स्टॉपवर वाट पाहत उभी असलेल्या पंजाबमधील एका विद्यार्थिनीची गोळीबारात हत्या करण्यात आली. सांगण्यात आले. हरसिमरत रंधावा (वय २१) असे तिचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की ती हल्लेखोरांचे लक्ष्य नव्हती. गुरुवारी (१७ एप्रिल) ही घटना घडली. (Student shot dead)

हॅमिल्टन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरसिमरत मोहॉक कॉलेजची विद्यार्थिनी आहे. ती तिच्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीच्या बसची वाट पाहत होती. त्यावेळी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास गोळीबार झाला. तिच्या छातीत गोळी लागली आहे. तिला उपचारासाठी तातडीने हलवण्यात आले. मात्र रुग्णालयात तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी सांगितले की, काळ्या मर्सिडीज एसयूव्हीमधील एका प्रवाशाने पांढऱ्या सेडानमधील प्रवाशांवर गोळीबार केला. मात्र गोळी रंधावाला लागली. गोळीबारानंतर दोन्ही कार घटनास्थळावरून वेगाने निघून गेल्या. (Student shot dead)

अधिकाऱ्यांनी सांगितले की, गोळीबार झालेल्या ठिकाणच्या शेजारील एका घराच्या खिडकीलाही गोळ्या लागल्या. यावेळी घरचे लोक टीव्ही पाहण्यात मग्न होते. तथापि, घरातील रहिवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही.

या घटनेचा तपास सुरू आहे. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. संशयितांची माहिती किंवा व्हिडिओ फुटेज उपलब्ध करून देण्यासाठी पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे. (Student shot dead)

या गोळीबारामुळे स्थानिक नागरिक तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये सार्वजनिक सुरक्षितता आणि हिंसाचाराबद्दल चिंता निर्माण झाली आहे.

टोरंटोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने यासंबंधीची एक पोस्ट ‘एक्स’वर केली आहे. “ऑन्टारियोमधील हॅमिल्टन येथे भारतीय विद्यार्थिनी हरसिमरत रंधावा हिच्या दुःखद मृत्यूने आम्हाला खूप दुःख झाले आहे.” अधिकाऱ्याने म्हटले आहे की, “स्थानिक पोलिसांच्या मते, या घटनेत तिचा हकनाक बळी गेला. दोन वाहनांतून आलेल्यांनी परस्पर गोळीबार केला. त्यातील एक गोळी तिच्या दिशेने गेली. त्यात तिचा मृत्यू झाला. सध्या हत्येचा तपास सुरू आहे. आम्ही तिच्या कुटुंबाशी जवळून संपर्कात आहोत आणि आवश्यक ती सर्व मदत करत आहोत. या कठीण काळात आम्ही शोकाकुल कुटुंबासोबत आहेत,” असे दूतावासाने म्हटले आहे.

हेही वाचा :
अंतराळवीर शुभांशू शुक्ला मे मध्ये अंतराळ मोहिमेवर
उद्योग नसणाऱ्यांकडून हिंदीला विरोध

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00