Home » Blog » Rohit Pawar claims : कृषिमंत्र्यांनी रमी खेळल्याचा अहवाल : रोहित पवार यांचा दावा

Rohit Pawar claims : कृषिमंत्र्यांनी रमी खेळल्याचा अहवाल : रोहित पवार यांचा दावा

by प्रतिनिधी
0 comments
Rohit Pawar claims

मुंबई : विशेष प्रतिनिधी : पावसाळी अधिवेशनावेळी विधिमंडळात मोबाईलवर रमी गेम खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे अडचणीत सापडलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. (Rohit Pawar claims)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना याबाबत अखेरचा चान्स दिला असला तरी हा व्हिडीओ सर्वप्रथम व्हायरल करणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सरचिटणीस आ. रोहित पवार यांनी त्याबाबतचा पाठपुरावा कायम ठेवताना आणखी एक बॉम्ब फोडला आहे. याप्रकरणी विधिमंडळ सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या चौकशीत कोकाटे हे २४ सेकंद नव्हे तर तब्बल १८ ते २२ मिनटे मोबाईलवर रमी खेळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला आहे, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. (Rohit Pawar claims)

रोहित पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करीत हा दावा केला आहे. त्यामुळे मंत्रिपद जाण्यापासून वाचलेले कोकाटे पुन्हा चर्चेत आले आहेत.

गेल्या आठवड्यात हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कोकाटे चांगलेच अडचणीत सापडले होते. त्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. मात्र, मुख्यमंत्रानी त्यांना अभय दिले.

मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कान टोचले. त्यावर कोकाटे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत यापुढे बोलतांना, वागताना काळजी घेण्याची हमी दिली आहे. त्यानंतर आता रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत निशाणा साधला आहे. त्यात म्हटले आहे की, कृषिमंत्री सभागृहात केवळ ४२ सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल आला आहे. हा अहवाल मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे. सरकार याबाबत खुलासा करेल का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. (Rohit Pawar claims)
तसेच सभागृहात तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांवर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्व. अटलजींच्या तर उपमुख्यमंत्री अजितदादांना स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? असं म्हणत रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना टोला लगावला आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00