Home » Blog » Rahul attacks EC: निवडणूक आयोग भाजपसाठी ‘मत चोरी’ करतो : राहुल गांधी

Rahul attacks EC: निवडणूक आयोग भाजपसाठी ‘मत चोरी’ करतो : राहुल गांधी

by प्रतिनिधी
0 comments
Rahul attacks EC

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी (१ ऑगस्ट) देशाच्या निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला.  (Rahul attacks EC)

आम्हाला जे सापडले आहे तो एक ‘अणुबॉम्ब’ आहे; निवडणूक आयोग भाजपसाठी ‘मत चोरी’ करत असल्याचे १००% पुरावे आमच्याकडे आहेत, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. (Rahul attacks EC)

निवडणूक आयोग भाजपसाठी मत चोरीचा मार्ग अवलंबत आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.

भारतीय निवडणूक आयोगावर (ECI) भाजपसाठी मत चोरीचा आरोप करत, राहुल गांधी यांनी दावा केला की त्यांनी आम्ही जे शोधले आहे तो ‘एक अणुबॉम्ब आहे, त्याचा स्फोट झाल्यावर आयोग गायब होईल, हे तुम्ही एकदा पहालच.’’

संसद संकुलात पत्रकारांशी बोलताना श्री. गांधी म्हणाले की, सुरूवातीला मध्य प्रदेशात आणि त्यानंतर  २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम्हाला संशय आला होता. त्यानंतर महाराष्ट्रात, काँग्रेसने हा मुद्दा हाताळत एक पाऊल पुढे टाकले आणि राज्य पातळीवर त्याची चौकशी केली.

‘हे उघड सत्य आहे. निवडणूक आयोग भाजपसाठी मतदान चोरीचा मार्ग अवलंबत आहे,’’ असे गांधी म्हणाले. (Rahul attacks EC)

इंडिया आघाडीच्या नेत्यानी लोकसभ अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन बिहारमधील विशेष सखोल पुनरावलोकन कार्यक्रमावर चर्चा करण्याची मागणी करावी, असे पत्र दिले. त्यानंतर राहुल गांधी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर हल्ला चढविला आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेले आरोप निराधार असल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले आहे. तसेच त्यांच्या या ‘निराधार आरोपांकडे दुर्लक्ष करा,’ असे म्हटले आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00