Home » Blog » इचलकरंजी परिसरात श्रुती जोशीकडून कौस्तुभ गावडेंचा प्रचार

इचलकरंजी परिसरात श्रुती जोशीकडून कौस्तुभ गावडेंचा प्रचार

by प्रतिनिधी
0 comments
Shruti Joshi campaigns for Kaustubh Gawade in Ichalkaranji

इचलकरंजी : प्रतिनिधी :  पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला इचलकरंजी परिसरात चांगली गती मिळत असून, विविध शाळा व महाविद्यालयांतील शिक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या आजीव सेविका डॉ. श्रुती जोशी यांनी परिसरातील विविध शैक्षणिक संस्थांना भेटी देत शिक्षकांशी संवाद साधला.  यावेळी त्यांनी कौस्तुभ गावडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. (Shruti Joshi campaigns for Kaustubh Gawade in Ichalkaranji)

डीकेटीई संस्थेच्या सर्व शाखांतील शिक्षकांचा संयुक्त मेळावा डी.के.टी.ई. इंजिनिअरिंग कॉलेज, राजवाडा, इचलकरंजी येथील सभागृहात उत्साहात पार पडला. या मेळाव्याला ४०० हून अधिक शिक्षक उपस्थित होते. डीकेटीईचे कार्यकारी संचालक रवी आवाडे यांनी कौस्तुभ गावडे यांना ठाम पाठिंबा व्यक्त केला. संस्थेतील शिक्षक व प्राध्यापक त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना भरघोस मतांनी विजयी करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

डॉ. श्रुती जोशी यांनी उपस्थित शिक्षकांशी संवाद साधताना कौस्तुभ गावडे यांनी शिक्षण क्षेत्रात आजवर केलेल्या कार्याचा आढावा घेतला. शिक्षकांच्या विविध प्रश्नांची जाण असलेले युवा नेतृत्व म्हणून त्यांची भूमिका स्पष्ट करतानाच, भविष्यात शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी मांडलेल्या संकल्पनांची माहिती दिली. शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणारे आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी पाठपुरावा करणारे नेतृत्व विधान परिषदेत पोहोचणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Shruti Joshi campaigns for Kaustubh Gawade in Ichalkaranji)

मणेरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजला दिलेल्या भेटीदरम्यान संस्थेचे अध्यक्ष शितल मणेरे यांनी कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारीला पाठिंबा व्यक्त केला. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी अनिलकुमार मणेरे, समन्वयक अशोक वसगडे, मुख्याध्यापिका पुष्पा ऐनापुरे आणि प्राचार्या वैशाली मंगसुळे उपस्थित होते. याशिवाय डॉ. जोशी यांनी इचलकरंजी परिसरातील विविध शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन शिक्षकांशी संवाद साधला.

या प्रचार दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र सूत गिरणीचे चेअरमन राजू मगदूम, प्राचार्य डॉ. एस. के. खाडे, डॉ. एस. टी. इंगळे, डॉ. धीरज शिंदे, प्रा. शशिकांत कुंभार, प्रा. विनायक भोई, प्रा. रोहित शिंगे, प्रा. प्रथमेश गवळी यांच्यासह गुरुदेव कार्यकर्ते, शिक्षक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. (Shruti Joshi campaigns for Kaustubh Gawade in Ichalkaranji)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!