Home » Blog » राज ठाकरेंनी जैन समाजाच्या शिष्टमंडळाला काय ठणकावले?

राज ठाकरेंनी जैन समाजाच्या शिष्टमंडळाला काय ठणकावले?

by प्रतिनिधी
0 comments
Raj Thackeray addressed the Jain community

मुंबई : प्रतिनिधी : मालाड येथील जैन समाजाच्या मुख्य पदाधिकारी आणि शिष्टमंडळाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चांगलेच सुनावले. ‘वर दोन गुजराती बसलेत म्हणून आम्ही वाटेल ते करु असे जैन समाजाला वाटते का? व्यापारी लोक आहात, व्यापार करा, शांत जगा, तुमच्या समाजातील लोकांना समजून सांगा’ असे ठणकावले. (Raj Thackeray addressed the Jain community)

मालाड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिरे टोपावर जैन समाजाच्या झेंडा लावल्याची घटना घडल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मालाड येथील जैन समाजाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी आज शनिवारी राज ठाकरे यांची भेट घेतली. तसेच घडलेल्या प्रकाराबाबत समाजाच्यावतीने राज ठाकरे यांना लेखी माफीनामा सादर केला.

यावेळी राज ठाकरे यांनी जैन समाजाच्या पदाधिकाऱ्यांना चांगलीच समज दिली. राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावर येऊ नका. तुमचा वापर केला जातोय. तुमची डोकी भडकवली जात आहे. तुमची डोकी लहान स्वरुपात भडकतील. पण आमची डोकी भडकल्यावर काय होईल? असा इशाराही दिला. (Raj Thackeray addressed the Jain community)

मुंबईत जैन समाजाकडून मारण्यात पांढऱ्या पट्ट्याबद्दल त्यांनी पदाधिकाऱ्यांना खडसावले. तुमच्या सोसायटीत कोणी येत असेल तर कार्पेट टाका. तुमचे जैन गुरू येऊन गेले की काढून टाका. सरसकट पांढरे पट्टे मारुन तुम्हाला काय सांगायचे आहे. विनाकारण वाद निर्माण करत आहात. इतकी वर्षे झाली. लोक राहतात. कधी भांडण नाही. वाद नाही. हे १० ते १२ वर्षात कसे सुरू झाले. वरती दोन गुजराती बसलेत म्हणून आम्ही वाट्टेल ते करु, असे जैन समाजाला वाटते का असा सवालही त्यांनी केला. (Raj Thackeray addressed the Jain community)

You may also like

error: Content is protected !!