नवी दिल्ली : हरियाणा आणि महाराष्ट्रातील मतदार यादीचा डेटा सामायिक करण्याच्या निवडणूक आयोगाच्या (EC) अहवालाच्या निर्णयाचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी (९ जून) कौतुक केले. तसेच आयोगाने ‘एक चांगले पहिले पाऊल,’ म्हणून स्वागत केले. पण निवडणूक आयोगाने हा डेटा डिजिटल, मशीनवर वाचनीय स्वरूपात कोणत्या तारखेपर्यंत देणार आहे याची अचूक तारीख जाहीर करावी, असे आवाहन केले आहे. (Rahul urged EC)
राहुल गांधी यांनी महाराष्ट्र निवडणुकीत ‘मॅच फिक्सिंग’ झाल्याचा आरोप आयोगावर केला होता. तसेच बिहारच्या निवडणुकीतही हाच प्रकार होईल किंबहुना, जिथे भाजप पराभूत होण्याची शक्यता असेल तिथेही हेच होईल, असा दावा केला होता.
त्यानंतर एका वृत्ताचा हवाला देऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी डेटा जाहीर करण्याची अचूक तारीख जाहीर करण्याचे आवाहन केले.
त्यांनी एका मीडिया रिपोर्टचा स्क्रीनशॉट शेअर केला. यामध्ये, वर्षाच्या सुरुवातीला दिल्ली उच्च न्यायालयाला दिलेल्या आश्वासनानंतर निवडणूक आयोगाने २००९ ते २०२४ पर्यंत हरियाणा आणि महाराष्ट्रासाठी मतदार यादीचा डेटा शेअर करण्याचा मार्ग मोकळा केला आहे, असा दावा करण्यात आला आहे. (Rahul urged EC)
तथापि, या वृत्तानुसार निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये गांधी म्हणाले, ‘‘मतदार यादी सुपूर्द करण्यासाठी निवडणूक आयोगाने उचललेले पहिले पाऊल हे चांगले आहे. ही माहिती डिजिटल, मशीन-वाचनीय स्वरूपात कधी दिली जाईल याची निवडणूक आयोग कृपया नेमकी तारीख जाहीर करू शकेल का?’’
गेल्या वर्षीच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करणाऱ्या त्यांच्या लेखावर श्री. गांधी यांनी निवडणूक आयोगाचे म्हणणे मागितले होते. त्यानंतर निवडणूक आयोगातील सूत्रांनी रविवारी (८ जून) विरोधी पक्षनेत्यांनी थेट पत्र लिहिले तरच निवडणूक आयोगसारखी घटनात्मक संस्था प्रतिसाद देईल, असे म्हटले होते.
निवडणूक आयोगाने सर्व सहा राष्ट्रीय पक्षांना स्वतंत्र संवाद साधण्यासाठी आमंत्रित केले होते. इतर पाच पक्षांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली, तर काँग्रेसने १५ मे ची बैठक रद्द केली, असेही निवडणूक आयोगाने निदर्शनास आणून दिले आहे. (Rahul urged EC)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरीचा केलेला आरोप निवडणूक आयोगातील सूत्रांनी फेटाळल्यानंतर शनिवारी श्री. गांधी यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, टाळाटाळ केल्याने त्यांची विश्वासार्हता जपली जाणार नाही, उलट सत्य बोलल्याने ती जपली जाईल.
हेही वाचा :
मोदींची कारकीर्द सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखी : नड्डा
मोदी पत्रकार परिषदांपासून पळ का काढताहेत? : काँग्रेस