Home » Blog » विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची दुसऱ्यांदा निवड

विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची दुसऱ्यांदा निवड

सरकार, विरोधी पक्षाकडून नार्वेकरांचे अभिनंदन

by प्रतिनिधी
0 comments
Rahul Narvekar file photo

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहूल नार्वेकर यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवडीची घोषणा आज (दि.९) करण्यात आली. विधानसभा अध्यक्षपद निवडीचा प्रस्ताव आज विधानसभेत मांडण्यात आला. यानंतर भाजपचे आमदार राहूल नार्वेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. काल (दि.९) नार्वेकर यांचा एकमेव अर्ज आला होता. यासह विरोधी पक्षाने ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. (Rahul Narwekar)

राहूल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यासाठी विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात प्रस्ताव मांडला. त्याला अनिल पाटील यांनी अनुमोदन दिले. यानंतर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी राहुल नार्वेकर यांच्या एकमताने निवडीची घोषणा केली.
राहूल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपदाच्या बिनविरोध निवडीची परंपरा कायम राखल्याबद्दल मी विरोधी पक्षाचे आभार मानतो. न्याय देण्याचे काम आपल्याकडून होईल. याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. पुढे ते म्हणाले की, राहूल नार्वेकर हे अभ्यासू, संयमी व्यक्तिमत्व असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. (Rahul Narwekar)

रविवारी (दि.९) राहूल नार्वेकर यांनी विधानसभा सचिवालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी रविवारी दुपारी बारापर्यंत अर्ज भरण्याचा वेळ होता. या निवडणुकीत सहभागी न होण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला होता. त्यामुळे राहूल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली.

 हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00