नाशिक : प्रतिनिधी : शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरते मर्यादीत ठेऊ नका. छत्रपती शिवाजी महाराज देशपातळीवर पोचले पाहिजेत असे प्रतिपादन अमित शहा यांनी रायगडावर शिवपुण्यतिथीदिनी केले होते. शहा यांच्या विधानाचा समाचार घेताना शिवाजी महाराज महाराष्ट्रापुरते मर्यादीत नाहीत. या उलट त्यांची किर्ती सातासमुद्रापार जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. मतांसाठी शिवाजी महाराज बोलू नका. देशभर आधी शिवजयंतीला सुट्टी जाहीर करा, अशी मागणी शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. (Thackray demand)
नाशिक येथे सुरू असलेल्या शिवसेना निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, अमित शहा यांनी सांगितले म्हणून छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रापर्यंत मर्यादित राहिलेले नाहीत. महाराजांनी ज्यावेळी सुरत लुटली तेव्हा लंडन टाईम्स मध्ये वृत्त प्रकाशित झाले होते. शिवाजी महाराज जगाच्या कानाकोपऱ्यात पोचले आहेत. तुम्हाला खरंच महाराजांबददल आदर असेल तर शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा, अशी मागणी केली. (Thackray demand)
काँग्रेसने मुसलमान अध्यक्ष करुन दाखवावा या नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा समाचारही ठाकरे यांनी घेतला. उद्धव ठाकरे म्हणाले, काँग्रेसच् प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, संघाने एक दलित समाजाच्या नेत्याला सरसंघचालक करुन दाखवावा. येत्या वर्षात संघाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. काँग्रेसला सव्वाशे वर्ष होत आहेत. संघाने आतापर्यंतचे सरसंघचालक आणि काँग्रेसने त्याच्या अध्यक्षांची यादी काढावी. कोण दलित होते कोण मुसलमान होते हे लोकांसमोर ठेवा असेही ठाकरे म्हणाले. (Thackray demand)
हेही वाचा :
‘आरएसएस’च्या खात्याचेही ऑडीट करा
अमित शहा महाराष्ट्रातील तीन पक्ष चालवतात