Home » Blog » Tiranga Mandal : राज्यस्तरीय गणेशोत्सव स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील तिरंगा मंडळाला प्रथम क्रमांक  

Tiranga Mandal : राज्यस्तरीय गणेशोत्सव स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील तिरंगा मंडळाला प्रथम क्रमांक  

by प्रतिनिधी
0 comments
Tiranga Mandal

कोल्हापूर : प्रतिनिधी :  राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-२०२५ मधील विजेत्या मंडळांची घोषणा केली आहे. राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अशा एकूण १३९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड गठीत समित्यांनी केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम गुरुवारी २५ सप्टेंबर  रोजी सकाळी ११ वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे होणार आहे. (Tiranga Mandal)

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५ अंतर्गत प्रथम क्रमांक सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा येथील तिरंगा गणेशोत्सव मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला.  व्दितीय क्रमांक लातूर जिल्ह्यातील वसुंधरा वृक्षरुपी गणेशोत्सव, राजीव गांधी चौक, लातूर व तृतीय क्रमांक अहिल्यानगर मधील सुवर्णयुग तरुण मंडळ, पाथर्डी, ता. पाथर्डी यांचा क्रमांक आला आहे. (Tiranga Mandal)

 जिल्हास्तरीय निकालामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील प्रथम क्रमांक शाहूवाडी तालुक्यातील डोणोली येथील श्री. गणेश तरुण मंडळ, झेंडा चौक या मंडळाने मिळवला.  द्वितीय क्रमांक श्री गणेश तरुण मंडळ, ढेंगेवाडी, राधानगरी व तृतीय आदर्श तरुण मंडळ, कागल तर तालुकास्तरीय निकालामध्ये करवीर मधील शाहूपुरी युवक मंडळ, गडहिंग्लजमधील फ्रेंड्स ग्रुप गणेश उत्सव मंडळ, मुत्नाळ व हातकणंगले तालुक्यातील श्री छत्रपती व्यायाम मंडळ, इचलकरंजी या मंडळांचा समावेश आहे. (Tiranga Mandal)

या स्पर्धेत राज्यस्तरीय प्रथम विजेत्या मंडळास ७ लाख ५० हजार रुपये, द्वितीय विजेत्यास ५ लाख रुपये तर तृतीय विजेत्यास २ लाख ५० हजार रुपये रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय विजेत्यांना अनुक्रमे ५० हजार, ४० हजार व ३० हजार रुपये, तर तालुकास्तरीय विजेत्या प्रत्येक मंडळास २५ हजार रुपये इतकी रक्कम व प्रमाणपत्र देण्यात येईल. (Tiranga Mandal)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00