Home » Blog » आमचे हिंदुत्व जनतेच्या डोळ्यातील अश्रू पुसणारे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आमचे हिंदुत्व जनतेच्या डोळ्यातील अश्रू पुसणारे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Chief Minister Shinde : आमचे हिंदुत्व जनतेच्या डोळ्यातील अश्रू पुसणारे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

by प्रतिनिधी
0 comments
Chief Minister Shinde

मारुती फाळके

उजळाईवाडी : आमचे हिंदुत्व हे बेगडी नाही तर ते लोकांच्या डोळ्यातले अश्रू पुसणारे आहे. आमच्या सरकारच्या काळात साधू-संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही. हिंदू धर्माच्या उत्थानासाठी जे जे करावे लागेल त्यासाठी सरकार सक्षम आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Shinde) यांनी केले. कणेरी  (ता.करवीर ) येथील सिद्धगिरी मठावर संत समावेश कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्यभरातून विविध संत-महंत उपस्थित होते.

शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे काही लोकांच्या पचनी पडत नाही. गरिबाच्या घरातील, सर्वसामान्य घरातला मुलगा नेतृत्व करतोय ही भावना काही लोकांना असह्य होत आहे, अशी टीका त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख न करता केली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्य आणि देशाच्या एकात्मतेसाठी धर्मसंमेलनासारखे जनजागृतीचे उपक्रम राबवणे आवश्यक आहे. येथील महासंमेलनामुळे समाजाचे अभिसरण होण्यास निश्चितपणे मदत होईल. राज्यात तीर्थक्षेत्र योजना, गडकोट किल्ल्यांचे संवर्धन, युनेस्कोमध्ये १४ किल्ल्यांची नोंद होण्यासाठी राज्य सरकारने सकारात्मक पावले उचलली आहेत.

पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी ६०० कोटी

राज्यातील तीर्थक्षेत्र विकासाला भरघोस निधी दिला आहे. कोल्हापूरच्या पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी ६०० कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे. आळंदी देवस्थानासाठी ३५० कोटी देऊन सरकारने तीर्थक्षेत्राच्या पुनरुत्थानासाठी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. सरकार जनतेचे आहे. जनतेसाठी  काही अटी -शर्ती  बदलाव्या लागल्या तरी कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00